देशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

लातूर जिल्हा महिला सेनेच्या नेतृत्वाची धुरा जयश्रीताई भुतेकरांकडे.

लातूर |(Bedhadak awaj)शिवसेना आता पुन्हा एकदा सक्रिय झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्हा महिला सेना जिल्हाप्रमुखपदी सौ. जयश्रीताई भुतेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, नेत्या नीलमताई गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.या निवडीत मराठवाडा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, संपर्कप्रमुख बळवंत जाधव, महिला संपर्कप्रमुख रंजनाताई कुलकर्णी तसेच लातूर जिल्हाप्रमुख सचिनभैय्या दाने यांचा विशेष समन्वय होता.तसेच लातूर शहरातही महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, सौ. प्रगतीताई डोळसे यांची शहर महानगरप्रमुखपदी, दिशा देशमुख यांची शहर उपजिल्हाप्रमुखपदी, रुक्मिणी इंगळे यांची रेणापूर तालुका प्रमुखपदी तर कल्पना बावगे यांची जिल्हा समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे.या निवडीनंतर लातूर जिल्हा महिला सेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, नव्या चेहऱ्यांना संधी देत पक्षाने नवसंघटनाची दिशा घेतली आहे. या नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भगवा फडकवण्याचे शिवसेनेचे लक्ष्य आहे.गेल्या काही दिवसांपासून मुंबईत शिवसेनेच्या उच्चस्तरीय बैठका सुरू असून, जिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या नेतृत्वात अनेक नव्या चेहऱ्यांचा पक्षप्रवेश सुरू आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात शिवसेना पुन्हा एकदा सशक्तपणे उभी राहत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.या नियुक्त्यांनंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, लातूर जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून, जिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत, “शिवसेना आता कार्यकर्त्यांच्या ताकदीवर लातूरमध्ये खाते उघडणार,” असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.शिवसेनेचा ‘ऍक्शन मोड’ सुरु झाला आहे, हे या नियुक्त्यांवरून स्पष्टपणे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button