देशक्राइमप्रशासनमहाराष्ट्र

“लाईनमेनच्या कामादरम्यान खाजगी लाईनमॅनचा शॉक लागून मृत्यू”

बेधडक आवाज (latur)
काझी मोहल्ला, दि. 17 डिसेंबर 2024: MSCB च्या पोलवर काम करत असताना खाजगी लाईनमॅन गोपीनाथ नागनाथ हुरदुडे (वय 50, रा. भातखेडा, लातूर) यांचा शॉक लागून आज रोजी 1:45 दरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक नागरिकांनी तसेच नातेवाईकांनी शंका व्यक्त केली की स्टेट लाईट बंद असल्याचे सांगूनही शॉक लागला कसा? तसेच खाजगी लाईनमॅनला पोलावर का चढवण्यात आले? असे अनेक प्रश्न नागरिकांना व नातेवाईकांना पडले आहेत.

गोपीनाथ यांच्या कुटुंबात तीन मुलं आणि पत्नी असे आहे तर संपूर्ण कुटुंब गोपीनाथ यांच्या वरती अवलंबून आहे. त्यांच्या मृत्यूस जबाबदार कोण, याचा तपास प्रशासन करत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य चौकशी होऊन सत्य समोर येईल, अशी अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button