07 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त,वमहाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत 67 गुन्हे दाखल.

बेधडक आवाज (जिल्हाप्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर जिल्हाभरातील अवैध धंद्यांविरोधात लातूर पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे. आज दिनांक 10/11/2024 रोजी पहाटे मासरेड चे आयोजन करून जिल्ह्यातील गावठी दारू बनविणारे अड्डे हुडकून नष्ट करून अवैध देशी-विदेशी मद्य व गावठी हातभट्टीची दारू असा एकूण 07 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व हातभट्टी रसायन नष्ट केला असून 67 व्यक्ती विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत 67 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डोंगर-दऱ्या, नदी-नाल्यांच्या दुर्गम भागातील हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात येत आहेत.

अडगळीच्या व दुर्गम भागातील हातभट्टी निर्मिती, विक्री व्यवसाय सारख्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात अडचण निर्माण होत असल्याने व हातभट्टी तयार करणाऱ्याकडून नव-नवीन शक्कल लढवीत अतिशय अडगडीच्या व दुर्गम जागेची निवड करण्यात येत होती. दुर्गम भागात असलेल्या हातभट्टी निर्मिती अड्ड्यांचा शोध घेण्यासाठी लातूर पोलीसाकडून हायटेक ड्रोनचा वापर करून अडगळीच्या व दुर्गम भागातील हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या ड्रोन स्ट्राईकमुळे आता अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ड्रोनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी एकाच ठिकाणी उभं राहून केली टेहाळणी केली.
लातूर पोलिसांनी अनेकदा अवैध हातभट्टी अड्ड्यावर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहे.तरीपण सदरचे गुन्हेगार नवनवीन मार्ग शोधून अतिशय अडगडीच्या व दुर्गम भागात जेथे पोलीस सहजपणे पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी हातभट्टी तयार करीत होते. सदरची बाब लक्षात येताच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या कल्पनेतून व अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिसांनी गावठी हातभट्टी निर्मितीचे अड्डे उध्वस्त करण्यासाठी नामी शक्कल लढवत *"ड्रोन स्ट्राईक"* करून पोलिसांनी एकाच ठिकाणी उभं राहून हातभट्टी तयार करण्यात येणाऱ्या परिसराची टेहाळणी करून दुर्गम ठिकाणी, झाडाझुडपामध्ये असलेल्या हातभट्टी निर्मिती ठिकाणाची ड्रोन च्या साह्याने व्हिडिओ व फुटेज घेऊन खात्री करून हातभट्टी अड्ड्यावर कारवाई करत ते उध्वस्त करण्यात आले आहे.लातूर जिल्ह्यातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी यापुढेही ड्रोन स्ट्राईकचं अनुकरण करण्यात येणार असून भविष्यात हा "ड्रोन स्ट्राईक" इतर कारवायांमध्ये ही वापरण्यात येणार आहे. ज्याद्वारे गुन्हेगारांच्या मुसक्या आळवणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्धची कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर पोलिसांना दिले होते. त्या अनुषंगाने अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे.