देशप्रशासनमहाराष्ट्रराजकारणशिक्षण

प्रभाग ६ मध्ये भाजपाच्या प्रचाराला ‘ताईंच्या लेकींची’ धार

रुद्राली–ऋषिका चाकूरकर मैदानात; महिलांशी थेट संवाद, प्रचाराला नवी ऊर्जा

Latur |दि 05/01/2026(बेधडक आवाज)

लातूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार रंगात येत असतानाच प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपाच्या प्रचाराला विशेष धार आली आहे. डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या लेकी रुद्राली व ऋषिका चाकूरकर या थेट प्रचार मैदानात उतरल्याने प्रभागात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात पायाला भिंगरी लावून, रात्रंदिवस झटणाऱ्या आणि ताईंच्या सावलीप्रमाणे कायम सोबत असलेल्या ॲड. मिना गायकवाड यांना भाजपाने मनपा निवडणुकीत प्रभाग ६ मधून उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेला प्रचाराचा अनुभव, काटेकोर नियोजन आणि संघटनशक्तीचा फायदा या निवडणुकीत नक्कीच होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

आईच्या विधानसभा निवडणूक प्रचारात संपूर्ण जबाबदारी एकहाती सांभाळणाऱ्या रुद्राली व ऋषिका चाकूरकर यांनी आता मनपा निवडणुकीतही आघाडी घेतली आहे. प्रभाग ६ मधील भाजपाचे उमेदवार गणेश गवारे, सौ. ज्योती आवसकर, ॲड. मिना गायकवाड आणि गौरव काथवटे यांच्या प्रचारासाठी रुद्राली–ऋषिका यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी कॉर्नर बैठका पार पडल्या.

हनुमंतवाडी, मोतीनगर आणि बसवेश्वर चौक येथे झालेल्या या बैठकींना महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. महिलांशी थेट संवाद साधत, त्यांच्या अडचणी, प्रश्न आणि अपेक्षा ऐकून घेण्यात आल्या. उच्चशिक्षित, मनमिळावू स्वभाव आणि प्रभावी संवादकौशल्य यामुळे रुद्राली व ऋषिका यांनी अल्पावधीतच महिलांशी जवळीक साधली.

या बैठकीदरम्यान उपस्थित महिलांनी चाकूरकर भगिनींसोबत मनमोकळा संवाद साधला. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भाजपाच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. रुद्राली व ऋषिका चाकूरकर या बहिणी प्रचारात सक्रिय झाल्याने प्रभाग ६ मधील भाजपाच्या उमेदवारांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, त्यांच्या निवडणूक प्रचारातील अनुभवाचा फायदा उमेदवारांना निश्चितच होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button