क्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

;पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि LCB टीमचे धाडसी ऑपरेशन पुन्हा चर्चेत

लातूर |14/04/2026

लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरु असलेल्या मोहिमेला आता खऱ्या अर्थाने धार येताना दिसत आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या ठोस आणि परिणामकारक नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आयपीएल सट्टेबाजांवर कारवाई करत गुन्हेगारीला थेट आव्हान दिले आहे. ही कारवाई केवळ एका टोळीचा पर्दाफाश नसून, लातूरमध्ये कायद्याची पकड किती मजबूत होत आहे याचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे.

अंबेजोगाई रोड परिसरात सुरू असलेल्या आयपीएल सट्ट्याच्या अड्ड्यावर पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली टाकलेला छापा अत्यंत अचूक नियोजन आणि धाडसाचे प्रतीक मानला जात आहे. या कारवाईत खालील चार आरोपींना रंगेहात पकडण्यात आले—

१) सचीन प्रकाश वलसे (वय ४७, रा. मयूरवन, अंबेजोगाई रोड, लातूर)

२) किरणकुमार अर्जुन केंद्रे (वय ४१, रा. कृपा सदन रोड, गणेश मेडिकल जवळ, लातूर)

३) गंगाधर रामराव घाडगे (वय ५१, रा. होळी, ता. लोदगा, जि. लातूर)

४) मनीष श्रीकांत पंचाक्षरी (वय ३७, रा. खडक हनुमान, दयाराम रोड, लातूर)

या आरोपींकडून तब्बल ₹१३.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम, सट्टा व्यवहाराच्या नोंदी आणि क्रेटा चारचाकी वाहनाचा समावेश आहे. विशेष म्हणजे आरोपी मोबाईल व ऑनलाइन माध्यमांचा वापर करून “सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स” या आयपीएल सामन्यावर सट्टा घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

SP अमोल तांबे यांनी लातूरमध्ये ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवत अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंगेश चव्हाण यांच्या सहकार्याने स्थानिक गुन्हे शाखा सतत सक्रिय राहून अशा कारवाया करत आहे.

पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर आणि त्यांच्या पथकातील राजेश घाडगे, युवराज गिरी, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख यांनी अत्यंत धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाई करत ही मोहीम यशस्वी केली.

अशाच प्रकारे सातत्याने कारवाई होत राहिली, तर लातूरमध्ये सट्टा आणि इतर अवैध धंद्यांना पूर्णविराम मिळू शकतो. SP अमोल तांबे आणि त्यांच्या टीमचे हे काम खरोखरच कौतुकास्पद असून, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ करणारे ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button