Uncategorizedआरोग्यक्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारणशिक्षण

मटका, जुगार, गुटखा, अमली पदार्थांची विक्री आणि जमिनीवरील बेकायदेशीर कब्जे अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

बेधडक आवाज (लातूर)दि-30/01/2025
शहर शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत असताना, मटका, जुगार, गुटखा, अमली पदार्थांची विक्री आणि जमिनीवरील बेकायदेशीर कब्जे असे अवैध व्यवसाय वाढत असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या प्रकारांना त्वरित आळा घालावा, अशी ठाम मागणी माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली.

पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अमित देशमुख यांनी लातूरमध्ये वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच, जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या खून प्रकरणांचा तपास जलद गतीने पूर्ण करून आरोपींना अटक केल्याबद्दल पोलीस यंत्रणेचे कौतुक केले. मात्र, वाढत्या अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी अधिक तत्परतेने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहराच्या विकासासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा भक्कम पाया मजबूत करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा अमित देशमुख यांनी व्यक्त केली. लातूर सुरक्षित आणि सुशासनाचे उत्तम उदाहरण बनावे, यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button