संतोष देशमुख प्रकरण धनंजय मुंडेंना भोवले; मंत्रिमंडळात डच्चू तर चव्हाणांना नवी जबाबदारी.

बेधडक आवाज
Dhanjay munde: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे पडसाद अद्याप उमटत असतानाच काही नावांवरून चर्चा वाढली आहे. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे नाव मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीतून वगळल्याचे बोलले जात आहे. मस्साजोग गावात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून संताप व्यक्त केला जात असून ग्रामस्थांनी आरोपींवर तातडीने कारवाईसाठी सरकारकडे मागणी केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनीही या संदर्भात संबंधित नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, अशी भूमिका घेतली होती. यामुळे धनंजय मुंडेंची राजकीय स्थिती बऱ्याच अडचणीत आल्याचे दिसते.
दुसरीकडे, भाजप नेते रविंद्र चव्हाण यांना मंत्रिपद न मिळता पक्षाकडून नवी जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येईल, असे सूत्रांकडून समजते. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपची ही महत्त्वाची रणनीती मानली जात आहे.
या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील काही नेत्यांचीही संधी हुकली आहे. काही नवीन चेहरे मंत्रिमंडळात दिसणार असले तरी जुन्या दिग्गजांच्या वगळण्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.