क्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

पुण्यातील बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू: आत्महत्या की घातपात?पोलीस तपासात गुंतवले.

बेधडक आवाज :-पुण्यातील दोन भावंडांचा केरळमध्ये दुर्दैवी अंत झाला आहे. डाकताई कोन्तिबा बामन (४८) आणि मुक्ता कोन्तिबा बामन (४५) अशी मृत व्यक्तींची नावे असून, ते तिरुवनंतपुरम येथील थंपनूर भागातील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले. शुक्रवारी १७ जानेवारी रोजी दोघे हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र, रविवारी हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रूमचा दरवाजा ठोठावला, तरी आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले.

पोलिसांनी दरवाजा उघडल्यानंतर डाकताई यांचा मृतदेह फासावर लटकलेल्या स्थितीत, तर मुक्ता यांचा मृतदेह बिछान्यावर आढळला. घटनास्थळी सुसाइड नोट सापडली असून, त्यामध्ये त्यांनी आर्थिक व कौटुंबिक अडचणींचा उल्लेख केला आहे. नोटमध्ये त्यांनी, “आमच्याकडे घर नाही, नोकरी नाही. आमचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करू नका,” असे लिहिले आहे.

पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे की, डाकताई यांनी आधी बहिणीची हत्या करून नंतर आत्महत्या केली असावी. मृत महिला दिव्यांग होती आणि ते उपचारासाठी तिरुवनंतपुरमला आल्याचे समजते. पोस्टमार्टम समोर आल्यावर कारण समजू शकणार असल्या व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button