
नागपूर, २२ जून २०२५ :
शैक्षणिक चळवळीत गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या ओम प्रकाश झुरळे यांना त्यांच्या कार्याची दखल घेत “फेमस अवॉर्ड 2025” ने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे पार पडलेल्या विशेष समारंभात केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शिक्षण क्षेत्रात नवकल्पना, सामाजिक भान आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणारे उपक्रम या माध्यमातून झुरळे सरांनी विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या सन्मानामुळे लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.
या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना ओम प्रकाश झुरळे म्हणाले, “हा सन्मान म्हणजे माझ्या कार्याच्या मूल्यांकनासोबतच नव्या प्रेरणेचा स्रोत आहे. हे यश मी माझ्या विद्यार्थ्यांना, सहकाऱ्यांना व सर्व सहयोगींना समर्पित करतो.”