क्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

#Amitshah अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात लातूरमध्ये काँग्रेसचे तीव्र आंदोलन.

लातूर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी लातूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. महात्मा गांधी चौकात मोठ्या प्रमाणावर जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी केले. त्यांच्यासोबत मोईज शेख, ॲड. दीपक सूळ, गोरोबा लोखंडे, कैलास कांबळे, प्रा. प्रवीण कांबळे, इम्रान सय्यद, नागसेन कामेगावकर, दत्ता सोमवंशी, आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. अमित शहा यांनी तत्काळ माफी मागावी, अशी काँग्रेसच्या वतीने मागणी करण्यात आली. या आंदोलनाला लातूरमधील नागरिकांनीही पाठिंबा दिला.

काँग्रेसने या आंदोलनाद्वारे डॉ. आंबेडकर यांची प्रतिष्ठा आणि त्यांच्या विचारांचा सन्मान टिकवण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button