क्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्र

पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन.

लातूर, दि. १६ जून २०२५ :
पो.स्टे एमआयडिसी लातूर हद्दीतील रेल्वे ट्रॅकजवळ एका अंदाजे ४० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना दिनांक १४ जून २०२५ रोजी घडली असून हा रेल्वे अपघात असल्याचे समजत आहे.रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास हि घटना नागरिकांच्या निदर्शनास आली , मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्तीचा मृतदेह साई रोडवरील रेल्वे रूळ परिसरात आढळून आला. पोलिसांनी तपासाअंती दिलेल्या अहवालानुसार, मृत इसमाचे वय अंदाजे ४० वर्षे असून, अंगाने सडपातळ व गोरा वर्ण आहे.दाडी वाढलेली उंची अंदाजे साडेपाच फूट त्याने अंगावर पांढऱ्या रंगाची शर्ट, गजगा रंगाचा पँट व गुलाबी रंगाचा अंडरवियर परिधान केलेला असून, डोक्याला, कानाला व तोंडाला गंभीर जखमा झाल्या आहेत. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने मृत्यूचे कारणही संशयास्पद मानले जात आहे.

घटनेबाबत एमआयडिसी पोलीस ठाण्यात आ.मु.नं. ४८/२०२५ कलम १७४ भा.दं.वि. प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोहेकॉ. १६६ जी.डी. चामे हे करत आहेत.

सदर इसमाची ओळख पटवण्यासाठी एमआयडिसी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणाला या व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास, त्यांनी तत्काळ एमआयडिसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

संपर्क क्रमांक:

  1. एमआयडिसी पो.स्टे. – ०२३८२-२२०१००
  2. पो.हे.कॉ. जी.डी. चामे – मोब. ९५५२५८७०५५
  3. समाधान चव्हाण, पोनि. एमआयडिसी – मोब. ८८८८८१९७१५

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button