अनोळखी मृतदेहाबाबत पोलिसांचे आवाहन!


लातूर, १४ जून २०२५ –
चिंचोलीराव वाडी शिवारातील हनुमान मंदिराजवळ असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या कडेला आज मध्यरात्री एक अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर इसम बार्शीकडून लातूरकडे येणाऱ्या कुठल्यातरी ट्रेनमधून पडून मयत झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मयत इसमाचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षांच्या दरम्यान असून, त्याने गुलाबी रंगाचा शर्ट, आत काळसर भगव्या रंगाचा टी-शर्ट, तसेच काळ्या रंगाची RONX कंपनीची नायलॉन ट्रॅकपँट परिधान केलेली होती. उजव्या हातात भगव्या-पिवळ्या रंगाचा गोफ, दुसऱ्या हातात काळा गोफ आणि गळ्यातही भगव्या रंगाचा गोफ असल्याचे आढळले आहे.

घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ८३/२०२५ अंतर्गत करण्यात आली आहे. सदर मयत व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास, पुढील नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन एमआयडीसी पोलीस ठाण्याने केले आहे:
📞 पोलीस निरीक्षक समाधान चवरे – ८८८८८५७११७
📞 पोलीस हवालदार किरण शिंदे – ८६२५८१९०९०
सूचना:
जर तुम्हाला मयत इसमाबाबत काहीही माहिती असेल, तर कृपया पोलिसांशी त्वरित संपर्क साधा. ही मदत एखाद्या कुटुंबाला त्यांच्या हरवलेल्या सदस्याचा पत्ता लावण्यास उपयुक्त ठरू शकते.