रिलायन्स-त्रिपुरा कॉलेजचा CET 2025 मध्ये राज्यभर यशाचा झेंडा.


लातूर, १७ जून २०२५ – रिलायन्स लातूर पॅटर्नचा प्रभाव पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय आणि रिलायन्स लातूर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांनी MHT-CET २०२५ च्या इंजिनीअरिंग (PCM) आणि मेडिकल (PCB) गटामध्ये उत्तुंग भरारी घेत लातूरचा शैक्षणिक वर्चस्व पुन्हा सिद्ध केला आहे.
या परीक्षेत मेडिकल गटासाठी २.८२ लाख व इंजिनीअरिंग गटासाठी ४.२० लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात त्रिपुरा महाविद्यालयाचे विद्यार्थी राज्यात अग्रेसर ठरले आहेत.
प्रमुख गुणवंत विद्यार्थी:
भोसले सुजित – ९९.९१% टक्केवारीसह महाविद्यालयात प्रथम
सिद्धी तोडकरी – ९९.७१%, द्वितीय
ओम ढाकणे आणि राधिका खरसाडे – प्रत्येकी ९९.६१%, तृतीय क्रमांक
उत्कृष्ट निकालाची आकडेवारी:
९९% पेक्षा अधिक टक्केवारी: ८ विद्यार्थी
९८% पेक्षा अधिक टक्केवारी: १४ विद्यार्थी
९७% पेक्षा अधिक टक्केवारी: १६ विद्यार्थी
९६% पेक्षा अधिक टक्केवारी: १९ विद्यार्थी
९५% पेक्षा अधिक टक्केवारी: २२ विद्यार्थी
हे यश संस्थेच्या नियोजनबद्ध मार्गदर्शन प्रणाली, अनुभवी प्राध्यापक वर्गाचे परिश्रम आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित आहे. याआधी १२वीच्या बोर्ड परीक्षेतही संस्थेने उल्लेखनीय निकाल सादर केला होता.
या गौरवाच्या क्षणी संस्थेचे अध्यक्ष मा. उमाकांत होनराव सर, सचिव व प्राचार्या सौ. सुलक्षणा केवळराम, कार्यकारी संचालक प्रा. ओंकार होनराव तसेच सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
लातूरचा शैक्षणिक ‘पॅटर्न’ आता राज्यात नव्हे, तर देशातही आदर्श ठरत असल्याची प्रचिती यशामुळे पुन्हा एकदा आली आहे.