प्रशासनमहाराष्ट्रराजकारण

सुधाकर शृंगारे साहेब हेही सत्य आहे.की आपली खूप दिवसाची काँग्रेस प्रवेशाची इच्छा,दलितांचे मत वळवण्यासाठी अमित देशमुख यांनी पूर्ण केली.

बेधडक आवाज (जिल्हा प्रतिनिधी):-
लातूर जिल्ह्यामध्ये सुधाकर शृंगारे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून ओळखले जायचे. परंतु त्याहून हि अधिक दलितांचा नेता, दलितांचा कैवारी, दलितांची मान उंचावणारा नेता म्हणून ओळखले आज ही जातात. सुधाकर शृंगारे यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कधीही कोणत्या दलितांना व सामान्य जनतेला सहज उपलब्ध होऊ शकले नाहीत असे कधीही झाले नाही. शृंगारे यांच्या दारून त्यांचा कार्यकर्ता किंवा सामान्य व्यक्ती कधीही निराश किंवा खाली हाताने परतला नाही. हे ज्यांना जवळून माहित आहे ते कधीही या गोष्टीला डावलू शकणार नाहीत. सुधाकर शृंगारे यांची ओळख सांगायची झाली तर सरळ साधा माणूस, ज्याच्या मनात जे आहे तेच

ओठावरती आहे आणि जे ओठावरती आहे तेच मनात अशी ओळख लातूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात शृंगारे यांची आहे. सुधाकर शृंगारे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये ईमानऐतबारे काम केले का तर यात तीळमात्र ही शंका नाही. आपला सरळ स्वभाव लातूर जिल्ह्यातील दलितांना व सर्वसामान्य जनतेला भुरळ पाडण्यासारखाच होता व आहे .परंतु भारतीय जनता पार्टीने आपल्याला बोटाच्या कटपुतली प्रमाणे वागणूक दिली, ज्या जागी आपल्याला मानसन्मान द्यायला हवा होता त्या जागी आपल्याला तो मानसन्मान भेटलाच नाही. हे स्वतः आपण कबूल अनेक मोठ्या सभेमध्ये केलेले आहे. भारतीय जनता पार्टीच्या मोठमोठ्या कार्यक्रमाला स्वखर्च्यातून आपण निधी दिलात. लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची मान कधी खाली होऊ नये. यासाठी आपण एक निष्ठेने काम केलात परंतु त्याचे फळ आपल्याला कधीही भारतीय जनता पार्टीने दिले नाही हे सिद्ध

झालंय. परंतु आपली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशाची इच्छा अनेक वर्षापासून मनामध्ये होती हे ही आपल्याला मान्य करावे लागेल.छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेच्या कार्यक्रमात आपण एक वर्षापूर्वी ज्यावेळी आपण भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून ओळखले जात होतात. त्यावेळी अमित देशमुख यांना आपण पदरात घ्यावे व कृपादृष्टी दाखवावी अशी इच्छा अमित देशमुखाकडे व्यक्त केली होती. व काल दिनांक-30/10/2024 रोजी काँग्रेसच्या उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर भर स्टेज वरती आपण भारतीय जनता पार्टीच्या लातूर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी आपापसातील वादामुळे किंवा जाणून-बुजून आपला प्रचार किंवा आपल्या सभा कुठेही होऊ दिल्या नाहीत हे जाहीर केलं. तसेच भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला जो

मानसन्मान हवा होता तो मानसन्मान मिळाला नाही हेही कबूल केलेत. परंतु प्रश्न हा पडतो कि खूप दिवसाची इच्छा जी अनेक दिवसापासून आपल्या मनामध्ये खदखदत होती कि अमित देशमुख यांनी आपल्यावर कृपादृष्टी दाखवावी व आपल्याला पदरात घ्यावं हि इच्छा विधानसभेच्या रणधुमाळीमध्येच पूर्ण का झाली. का अमित देशमुख यांनी विधानसभेच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्षप्रवेश करण्यास आमंत्रित केले. याचे गणित सरळ व सोप्या पद्धतीने जनता लावीत आहे. ते म्हणजे दलित समाजाची वोटिंग अमित देशमुख यांना आपल्याकडे पाहून मिळावी. जो समाज अमित देशमुख यांच्या कामावरती नाराज आहे. ज्या समाजाचे ज्वलंत प्रश्न अनेक वर्ष झाले अमित देशमुख यांनी पाहिलेच नाहीत किंवा सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या समाजाची वोटिंग आपण काँग्रेस पक्ष प्रवेश केल्यामुळे सहजरीत्या मिळवण्याचा प्रयत्न अमित देशमुख यांचा असू शकतो. मग आपण जो विचार करून काँग्रेस पक्षात प्रवेश केला की जो मानसन्मान आदर भारतीय जनता पार्टीत मिळाला नाही. तो मानसन्मान आदर काँग्रेस पक्षात आपल्याला मिळेल अशी शाश्वती आपल्याला आहे का? हा प्रश्न दलितांना व सर्वसामान्यांना सध्या तरी पडलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button