देशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

“घंटानाद आंदोलन : नागरिकांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसचा प्रशासनाला जागर”

बेधडक आवाज – लातूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने घंटा नाद आंदोलन करण्यात आले आहे. हे आंदोलन मंगळवार, ४ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता लातूर महानगरपालिका कार्यालयासमोर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे.

लातूर शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन आणि इतर नागरी समस्यांकडे प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. नागरिकांच्या या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने घंटा नाद आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी महापौर, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष आणि शहरातील सुजान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button