“मंत्र्यांकडून पुन्हा छळ; सरसेनापतींच्या घराण्यातील भगिनींचा आमरण उपोषणाचा इशारा”

बेधडक आवाज – सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील भगिनींनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा दावा आहे की, २०१६ मध्ये आमदार असताना गोरेंनी त्यांना अश्लील फोटो पाठवले होते, ज्यामुळे त्यांना १० दिवस तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यानंतर त्यांनी न्यायालयात माफी मागितली होती आणि भविष्यात त्रास देणार नाही, असे लेखी दिले होते. मात्र, आता मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडून पुन्हा मानसिक छळ सुरू झाला असल्याचा आरोप या भगिनींनी केला आहे.

या प्रकरणात त्यांची बदनामी करण्यासाठी माध्यमांमध्ये खोटे पत्र व्हायरल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे कुटुंबाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर १७ मार्चपासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी राज्यपालांना दिला आहे.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर सतत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, मंत्र्यांवरील आरोपांमुळे सरकारच्या भूमिकेवरही टीका केली जात आहे. गुन्हेगार आणि भ्रष्टाचार करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतूनही होत आहे.