प्रस्थापित मराठ्यांचे नेते प्रेम,,, लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात मराठा आरक्षण चळवळील गालबोट लागण्याचे संकेत..

बेधडक आवाज (मुख्यसंपादक)-
मराठा समाजाची दिशाभूल करणाऱ्या सरकार विरोधात मराठा समाज व चालू सरकारच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून नाराज असलेली सर्वधर्मीय जनता काही गावांमध्ये नेत्यांना गावबंदी तर काही जागी नेत्यांच्या प्रचाराला,सभेला पाठ फिरवताना दिसत आहेत. अनेक जागी माँ जिजाऊ व शिवरायांची शपथ ही घेतली जात आहे.विशेष नांदेड व धाराशिव जिल्ह्यामध्ये नेत्यांना व कार्यकर्त्यांना साधी कॉर्नर बैठक सुद्धा घेता येत नाही.तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये, मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या मराठा आरक्षण चळवळीला
कुठेतरी राजकीय किनार लागत आहे की काय अशी भिती मराठा आंदोलकांमध्ये निर्माण होताना दिसत आहे. या सर्व बाबीचे असे कारण असू शकते की, मनोज जरांगे पाटील यांनी 288 उमेदवार विधानसभेला उभा करण्याचे आव्हान केले. राजकारणाची लालसा मनामध्ये बाळगणारे अनेक तरुण व ज्येष्ठ नागरिक राजकीय स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी आंतरवालीच्या उमेदवार बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होताना पाहिला मिळाले. या बैठकीत अनेक राजकीय अनुभव असलेले व कोणत्या ना कोणत्या पक्षात कार्यकर्त्याची भूमिका बजावणारे
नवतरून व जेष्ठ नागरिक उत्सुकतेने म्हणून जरांगे पाटील आपल्याला उमेदवारी जाहीर करतील या उमेदीने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेली असावेत,, परंतु याच मराठा आरक्षण आंदोलनाची दुसरी बाजू पाहिला गेली तर मनोज जरांगे पाटील यांनी बाळगलेले भीती की आपण जर राजकारणामध्ये उतरलो तर कित्येक वर्षापासून एकवटलेला मराठा समाज पुन्हा विखरला जाऊ नये. व मराठा समाजाच्या मुलाबाळाच अस्तित्व (भविष्य)पुन्हा अंधकारमय होऊ नये. या भीतीची जाण असणारा मराठा समाज अनेक गावांमध्ये नेत्यांच्या प्रचाराला व
बैठकीला जाणार नाही अशी शपथ घेत आहे. तर इतर जागी नेते मंडळीला साद रस्त्यावरून गाड्या जाण्याला सुद्धा मराठा समाज गावोगावी विरोध करताना पाहायला मिळत आहे. याच घटनेच्या दुसऱ्या बाजूने विचार केला गेला तर कोणत्या ना कोणत्या पक्षांमध्ये कार्यकर्त्याची भूमिका बजावणारा मराठा तरुण आज आपल्या नेत्याची वाट पाहत शाल व श्रीफळ घेऊन हार घालून सत्कार करताना पाहायला मिळत आहे. प्रस्थापित विरोधात विस्थापित लढत अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. या घटनांचा कुठे ने कुठे मराठा आरक्षण संघर्षाला
गाल बोट लागण्याची भीती विस्थापित मराठ्याच्या मनामध्ये धडकी भरवत आहे. तसेच मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात नेतेमंडळीचा आत्मविश्वास गगनात मावत नसल्याचे पाहायला मिळते याचे कारण असेही असू शकते की मराठा समाज कितीही विरोधात असला तरीही मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचे संकेत या नेतेमंडळीला मिळत असावेत….