आता राजाचं लेकरू, राजा होणार नाही. आमदाराचं पोरग,आमदार होणार नाही.

बेधडक आवाज – (जिल्हा प्रतिनिधी, लातूर)
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभेत जवळपास 130 ते 40 आमदार निवडून गेले परंतु एकाही मराठा आमदाराने मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळात चर्चा केली नाही. किंवा मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून धडपड केली नाही,या सर्व गोष्टीवरून असे लक्षात येते की प्रस्थापित मराठी हे विस्थापितांना आरक्षण देऊ इच्छित नाहीयेत आणि विस्थापित मराठे असेच आर्थिक व सामाजिक कमकुवत राहावे म्हणून सतीश करांडे हा तरुण मराठा समाजातील एक आंदोलन करता म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्वसामान्य मराठ्यांचे प्रश्न
मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.तसे तर सर्वजण म्हणतात की वंचितांना न्याय देऊ विस्थापितांना तिकीट देऊ परंतु तिकीट वाटप होत असताना असे कुठेच दिसून येत नाही.आणि सर्वसामान्य चळवळीतील तरुणांनच्या आवाजाला कुठेतरी दाबलं जातं म्हणून ज्या वेळेस सतीशने तोंडाला काळ लावून मी आमदार म्हणून सर्व आमदारांचा निषेध केला. तेव्हाच ठरवलं होतं की सतीश करांडे यांनी प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात आपली भूमिका ठामपणे मांडायची आज या निवडणुकीला सामोरे जात असताना त्याचे एकमेव कारण प्रस्थापित विरुद्ध

विस्थापित मराठा बहुतेक शहरातील विस्थापित मराठी या सतीशच्या भूमिकेला समर्थन देतील ही अपेक्षा शहरातील प्रत्येक कामात शहरातील प्रत्येक गोष्टीमध्ये आंदोलन असेल सामाजिक सलोखा असेल या सर्व गोष्टींमध्ये सतीश करांडे याने सर्वतोपरी कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या विधानसभेमध्ये लातूर शहरातील सुज्ञ नागरिक नक्कीच या सतीश च्या केलेल्या कार्याचा आढावा घेऊन नक्कीच सतीश करंडे याला विधानसभेमध्ये मतदान करतीलसर्वसामान्य युवक हा फक्त आंदोलन करणे आणि निवडणूक लागली की पक्षाची
झेंडे घेऊन फिरणे याच कामाचा बनत चालला आहे.कारण की या प्रस्थापित लोकांनी पैशाशिवाय काही होऊ शकत नाही पैसा असेल तरच निवडणूक लढली पाहिजे अशा चुकीच्या गोष्टी पसरवून सर्वसामान्य युवकांना या निवडणुकीच्या प्रक्रियेतून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्य लोकांनी फक्त मतदान करायचं झेंडे उचलायचे आणि आपलं काम करत राहायचं आणि आमदाराच्या पोरांनी आमदारच व्हायचं लातूर शहरांमध्ये पाहिलं तर घराणेशाही दिसून येते ती घराणे शाही देशमुखांची असेल व चाकूरकरांचे असेल किंवा कवेकरांची असेल शेवटी घराण्यातूनच आमदार होता येतं आणि आमदार व्हायला घरानच लागतं उमेदवार व्हायला घराण्यात जन्म घ्यावा लागतो ही प्रथम मोडण्यासाठी ही निवडणूक सर्वसामान्य युवकांचे मनोबल वाढवण्यासाठी सतीश करांडे लढणार आहे.