वाळू माफियांची पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ गुन्हा दाखल होताच वाळू माफियाचा माज उतरला असे नाही!

लातूर, दि. ८ एप्रिल: दिवसेंदिवस लातूर जिल्ह्यात वाळू माफिया व भूमाफिया मोठ्या प्रमाणात आपले जाळे पसरवत असल्याचे निदर्शनास येत आहे. या वाळू माफिया व भूमाफिया मार्फत अनेक वेळा अधिकारी,पत्रकार व सामान्य जनतेला वेटीस धरत असल्याचे व सर्रासपणे धमकावणे जीवे मारण्याचा प्रयत्न वारंवार होत असताना सुद्धा प्रशासनातील काही अधिकारी या वाळू माफियाला भूमाफियाला पाठबळ देत असण्याचे चित्र आपल्याला वारंवार दिसून येते.परंतु या वेळेस चित्र फारसे वेगळे दिसून येत आहे. पत्रकारांना शिवीगाळ करणे या माफियांना महागात पडणार आहे. जे पत्रकार अशा भूमाफिया यांना व वाळू माफियांना भीक घालत नाहीत असे पत्रकार एकजुटीने या वाळू माफियांच्या व भुमाफियाना पाठबळ देणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांच्या संबंधांचा बोलबाला जनतेसमोर मांडणार असल्याचे समजते. जिल्ह्यातील पत्रकारांनी या घटनेच्या विरोधात हे टोकाचे पाऊल का उचलले तर पाहूया,
वाळू माफिया व भूमाफिया मार्फत अनेक वेळा“मी वाळू वाला आहे” असे म्हणत पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन
वाळू माफियांविरुद्ध स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डीमार्टजवळ घडली.
पत्रकार नेताजी जाधव हे अहिल्यादेवी होळकर चौक ते गरुड चौकाकडे जात असताना, रस्त्याच्या कडेला स्कुटीवर थांबलेल्या दोन व्यक्तींनी अचानक त्यांच्या न्यूज चॅनलच्या वाहनासमोर येत त्यांना अडवले. कोणताही अपघात न घडता, त्यांनी “तू पत्रकार आहेस कि बे? तुला गाडी चालवायचं कळत नाही का?” अशा शब्दांत अत्यंत अश्लील आणि खालच्या पातळीवरील शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर पत्रकार नेताजी जाधव यांनी ५ एप्रिल रोजी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 234/2025 अन्वये भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत कलम 296, 352, 351(2), 351(3), 3(5) व मोटार वाहन कायदा 1998 मधील कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेत अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेडेकर हे करत आहेत. आज दिनांक ८ एप्रिल रोजी आरोपींना अटक करून उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांच्या समोर हजर करण्यात येणार असल्याची माहितीही पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली.
या घटनेनंतर लातूर जिल्ह्यातील सुमारे ५० पत्रकारांचे शिष्टमंडळ पोलीस निरीक्षकांची भेट घेण्यासाठी पोहोचले. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सुधाकर बावकर, दिलीप सागर, संतोष पाटील यांनी तात्काळ दखल घेतलेली कारवाई केल्यामुळे पत्रकारांनी समाधान व्यक्त केले आणि आभार मानले.
शिष्टमंडळात सितम सोनवणे, लहू शिंदे, निशांत भद्रेश्वर, नितीन बनसोडे, विष्णू आष्टीकर, लिंबराज पन्हाळकर, खंडेराव देडे, हरिश्चंद्र जाधव, हारून सय्यद, सालार शेख, संदीप भोसले, सुनील कांबळे, अमोल घायाळ, संतोष सोनवणे, आनंद दणके, अजय घोडके, हारून मोमीन, के वाय पटवेकर, संजय गुच्चे, प्रकाश कंकाळ, धनराज वाघमारे, विशाल सूर्यवंशी, विकी पवार, अहिल्या कसपटे, दिनेश गिरी, श्रीकांत चलवाड यांचा समावेश होता.
पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि योग्य ती कारवाई यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेबाबत विश्वास निर्माण झाला आहे.