धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेसतर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.

लातूर प्रतिनिधी :
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आणि लोकप्रिय नेते धिरज विलासराव देशमुख यांचा वाढदिवस लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला.
रविवार, दिनांक ६ एप्रिल रोजी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात अभिषेक व आरती करून दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर सुरत शहावली दर्गा येथे चादर अर्पण करण्यात आली. राम मंदिरात पूजा झाल्यानंतर गंजगोलाईतील श्री जगदंबा मंदिरात आरती करून धर्मिक सौहार्दाचे सुंदर उदाहरण घालून देण्यात आले.
या उपक्रमात लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, दगडूआप्पा मिटकरी, गोरोबा लोखंडे, कैलास कांबळे, संभाजी रेड्डी, महादेव मुळे, प्रा. प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, ॲड. देविदास बोरुळे पाटील, विष्णुदास धायगुडे, ॲड. गोपाळ बुरबुरे, अभिजीत इगे, पवनकुमार गायकवाड, अशोक सूर्यवंशी, बब्रूवान गायकवाड, अभिषेक पतंगे, ॲड. किसन शिंदे, पिराजी साठे, युसुफ बाटलीवाला, अमोल गायकवाड, अजित सूर्यवंशी, सोमनाथ टोटाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धिरज देशमुख यांच्या कार्यप्रवृत्तीप्रमाणेच त्यांचा वाढदिवस सामाजिक व धार्मिक सौहार्द जपत उत्साहात साजरा झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.