आरोग्यक्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

४ लाख ३ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एक जण अटकेत, एक फरार.

लातूर | दिनांक ७ एप्रिल २०२५ : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री कारवाई करत ४ लाख ३ हजार ८०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूसह चारचाकी वाहन आणि मोबाईल जप्त केला आहे. या प्रकरणी एकजण अटकेत असून दुसरा आरोपी फरार आहे.

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

६ एप्रिल रोजी मध्यरात्री २:३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेला खात्रीशीर माहिती मिळाली की, महाराष्ट्र शासनाने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ (गुटखा, सुगंधित तंबाखू) वाहतूक केली जात आहे. त्या आधारे पथकाने सापळा रचत गुटख्यासह चारचाकी वाहन आणि मोबाईल असा एकूण ४ लाख ३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणात अभिलाष गुरुनाथ गीते (वय १९, रा. पशुपतिनाथ नगर, लातूर) याला अटक करण्यात आली असून मुकेश लहाने नावाचा आरोपी सध्या फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एमआयडीसी पोलीस उपनिरीक्षक प्रशांतसिंग राजपूत आणि पोलीस अंमलदार दत्तनगिरे करत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, अर्जुन राजपूत, राहुल कांबळे, प्रदीप चोपणे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button