मराठा समाजाला लोकसभेत पर्याय नव्हता म्हणून डॉ.काळगे निवडून आले!! मराठा समाज विधानसभेत,पर्याय म्हणून कोणाकडे पाहणार?

बेधडक आवाज,मुख्यसंपादक-(शरद पवार)
लोकसभेमध्ये मराठा समाजाची भूमिका भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पाडण्याची होती ही सर्व बाब महाराष्ट्रातील जनते समोरील आहे.परंतु विधानसभेमध्ये जरांगे पाटील यांनी उमेदवार उभा करण्याची भूमिका स्पष्ट केली असताना, मराठा समाजाच्या आग्रहाखातीर उमेदवार न उभा करण्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. तर पुन्हा हा प्रश्न उपस्थित होतो की लोकसभेमध्ये जरांगे पाटील व मराठा आंदोलक यांनी पाडापाडीची भूमिका हाती घेतली होती. तीच भूमिका पुन्हा विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाने हाती घेतली असावी यात काहीच शंका नाही.परंतु मराठा समाज हा विधानसभेच्या रणधुमाळी मध्ये

नेमकं पाठिंबा कोणत्या उमेदवारांना दिल हा प्रश्न संपूर्ण लातूर जिल्ह्यातील मराठा बांधवांना पडलेला आहे. तर उमेदवार कोणत्या पक्षाचा पाडायचा आहे हे समाजासमोर स्पष्ट जरी असले तरी नेमकं इतर पक्षाच्या कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा व त्याला निवडून आणायचं या बाबीपासून मात्र मराठा समाज संभ्रमात असल्याचे निदर्शनास येत आहे.लातूर शहर व ग्रामीण येथील मराठा समाजातील नागरिकात व तरुणात एकच प्रश्न सध्या चर्चेचा दिसत आहे. तो म्हणजे लोकसभेमध्ये नाईलाजाने काँग्रेस पक्षाने उभा केलेले डॉक्टर शिवाजी काळगे यांना मत देऊन निवडून आणण्यात आले होते. परंतु त्याच नाईलाजा पायी आता काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून
द्यायचे का? हा प्रश्न सध्याला लातूर शहर व ग्रामीण भागातील नवतरुणांना व नागरिकांना पडलेला सध्या दिसत आहे.तसेच लातूर शहरात पर्याय म्हणून मराठा समाज स्वराज्य पक्षाचे उमेदवार सतीश करंडे यांच्याकडे व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके यांच्याकडे पर्याय म्हणून पाहत आहे का? कि पर्याय म्हणून पुन्हा काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे पाहणार?हा सध्या तरी मराठा समाजाला पडलेला ज्वलंत प्रश्न आहे. नेमकं पर्याय म्हणून मराठा समाज कोणत्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील हे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच स्पष्ट होईल.