क्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्र
लातूरमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून हत्या, आरोपी महिलेचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

लातूर : लातूर जिल्ह्यात अनैतिक संबंधांच्या संशयातून एका 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या हत्येप्रकरणातील आरोपी महिलेचाही मृतदेह संशयास्पद अवस्थेत झाडाला लटकलेल्या स्थितीत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
करकट्टा गावाजवळ पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शरद इंगळे यांची विळा आणि धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असता, एका संशयिताला अटक करण्यात आली.
शरद इंगळे यांचा गळा चिरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून मुरुड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद इंगळे यांच्या हत्येमागे विवाहबाह्य संबंधांचा संशय आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.