

लातूर – दिनांक : 12 जुलै 2025पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यात गुटखाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. दिनांक 11 जुलै 2025 रोजी सकाळी 10 ते 12 दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी अचानक धाडसत्र राबवून 67 पोलिस पथकांमार्फत 23 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील शाळा आणि महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरातील पानटप्या, किराणा दुकाने यांची तपासणी करण्यात आली.या कारवाईदरम्यान राज्य शासनाने विक्री, वाहतूक आणि साठवणीस प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू साठवणूक व विक्री करत असलेल्या 10 जणांविरुद्ध 9 गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण 16 लाख 89 हजार 287 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.प्रमुख गुन्हे खालील पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आले –चाकूर पोलीस ठाणे – 3 गुन्हेशिवाजीनगर पोलीस ठाणे – 2 गुन्हेएमआयडीसी पोलीस ठाणे – 2 गुन्हेगांधी चौक पोलीस ठाणे – 2 गुन्हेगुन्हे भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 च्या कलम 59 अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत.दाखल आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –1. मारुती राजेंद्र सोमवंशी, वय 32, रा. सोसायटी चौक, चाकूर2. बालाजी विठ्ठल कोरे, वय 28, रा. अलगरवाडी, ता. चाकूर3. प्रमोद निवृत्ती कुंभार, रा. घरणी, ता. चाकूर4. सुनीलसिंग अनिलसिंग ठाकूर, वय 35, रा. आनंदनगर, झीनत सोसायटी, लातूर5. सिराज गयास अली सलाउद्दीन शेख, वय 51, रा. शिरूर अनंतपाळ6. अजीम उमाटे, रा. कपिल नगर, लातूर7. फिरोज उमाटे, रा. कपिल नगर, लातूर8. असलम उमाटे, रा. कपिल नगर, लातूर9. जहीरपाशा चांदपाशा परदेशी, वय 42, रा. आझम चौक, लेबर कॉलनी, लातूर10. समीर शेख, रा. खाडगाव रोड, लातूरसर्व गुन्ह्यांचा तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांकडून ही मोहीम राबवण्यात आली असून, अशी तपासणी मोहीम नियमित सुरू राहणार आहे. तसेच तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांविरुद्ध आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.