लातूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी: राहुलकुमार मीना

Bedhadak awaj राज्य शासनाने मंगळवारी (दि. १८ फेब्रुवारी २०२५) नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या अंतर्गत, गडचिरोली येथील प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास) आणि सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले राहुलकुमार मीना यांची लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राहुलकुमार मीना हे २०२१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, ते मूळचे राजस्थानमधील सवाई माधोपुर जिल्ह्यातील आहेत. गडचिरोली येथे दीड वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी या पदांवर काम केले आहे.
लातूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांची भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्याने, त्यांच्या जागी राहुलकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राहुलकुमार मीना यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा परिषदेच्या विकास कामांना नवीन गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.