देशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

शिवसेना सदस्य नोंदणी बैठक आणि पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न.

Bedhadak awaj लातूर: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि शिवकार्य शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने लातूर शासकीय विश्रामगृहात शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना उपनेते व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर औताडे, युवक काँग्रेसचे कोंडिराम काळे, परमेश्वर घोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे लातूर जिल्ह्यात शिवसेना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

शिवसेना जिल्हाप्रमुख सचिनभैय्या दाने यांनी आगामी लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच पक्ष वाढीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, असे निर्देश शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांनी दिले.

यावेळी लातूर जिल्हा संपर्क प्रमुख बळवंत भाऊ जाधव, औसा-निलंगा जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, लातूर तालुका प्रमुख राजकुमार सुरवसे, औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button