देशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

लातूरच्या बससेवेचा कायापालट?अमित देशमुखांच्या मागण्यांना मंत्र्यांची ग्रीन सिग्नल.

मुंबई | 9 जुलै – लातूर शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि बस स्थानकांच्या सुधारणा संदर्भात आज परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. लातूर शहरासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या अनेक मागण्या या बैठकीदरम्यान मांडण्यात आल्या. विशेष म्हणजे, या सर्व मागण्यांचा पाठपुरावा आमदार तथा माजी मंत्री अमित देशमुख यांनी सातत्याने केला असून, त्यांच्याच पुढाकारातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले.लातूर हे मराठवाड्यातील प्रमुख शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यापारी केंद्र असल्याने येथे सुसज्ज बसस्थानक आणि आधुनिक वाहतूक सुविधा असणे गरजेचे आहे, यावर बैठकीत भर देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक व शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बीओटी तत्त्वावर पार्किंगसह अत्याधुनिक बस स्थानक उभारण्यास यापूर्वीच मंजुरी मिळालेली असून, ती कामे तातडीने सुरू करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांसाठी अमित देशमुख यांनी स्वतः विविध अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.तसेच, लातूर शहरासाठी मंजूर असलेल्या इलेक्ट्रिक बस तातडीने उपलब्ध करून देणे आणि महत्त्वाच्या शहरांशी त्यांची वाहतूक सुरू करणे याबाबतही बैठक झाली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी अपूर्ण असलेली बसस्थानकांची कामे लवकर पूर्ण व्हावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.लातूरमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयाची जीर्ण अवस्था लक्षात घेता, त्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी मागवण्यात आलेल्या ७८ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात यावी, अशीही मागणी झाली. शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनांची अडवणूक होणे ही गंभीर बाब असून, शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी अशा वाहनांवर अडथळा आणू नये, अशाही सूचना देण्यात याव्यात, असा आग्रह धरण्यात आला.या सर्व मागण्यांवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना केल्या. लातूरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या मागण्या मान्य करून लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.या सर्व मागण्यांमागे आमदार अमित देशमुख यांचा दूरदृष्टीचा दृष्टिकोन आणि लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली बांधिलकी स्पष्टपणे दिसून आली. लातूरच्या जनतेच्या हितासाठी त्यांनी केलेला हा पुढाकार जिल्ह्याच्या परिवहन विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button