देशमुख कुटुंबियांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती.

लातूर | २१ मे 2025
भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात अभिवादन कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी राज्याचे माजी मंत्री आणि मांजरा साखर कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख, माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
या श्रद्धांजली सोहळ्यास लातूर आणि परिसरातील विविध सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन वैजनाथ शिंदे, रेणा कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले, जागृती, ट्वेंटीवन आणि इतर साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी आणि कार्यकारी संचालक मंडळ उपस्थित होते.
राजीव गांधी यांचे देशासाठीचे योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले. ग्रामीण विकास, माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या पुढाकाराचा विशेष उल्लेख करण्यात आला.