लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी वितरित होणार: आदिती तटकरे यांची माहिती

बेधडक आवाज :-mumbai लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी हप्त्याबाबत राज्यातील महिलांमध्ये उत्सुकता होती. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारीच्या आधी लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केला जाईल.
आदिती तटकरे यांची भूमिका:
“डिसेंबर महिन्याचा हप्ता २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान वितरित केला होता. योजनेच्या जानेवारी हप्त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद अर्थखात्याकडून मंजूर झाली आहे. त्यामुळे २६ जानेवारीपूर्वी हप्त्याचे वाटप सुरू होईल. त्यानंतर तीन ते चार दिवसांत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होतील,” असं तटकरे यांनी स्पष्ट केलं.
या निर्णयामुळे योजनेच्या लाभार्थींना दिलासा मिळाला असून, जानेवारी महिन्याचा हप्ता वेळेत मिळेल, याची खात्री झाली आहे. राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत आहे.