“शहराच्या मध्यवस्तीत पापाचा डाव, पोलिसांनी उघडला अनैतिक व्यवहाराचा घाव!”

लातूर –दि/21/05/2025
शहरातील शिवाजी रोड स्क्रॅप मार्केटजवळ असलेल्या आनंद लॉजवर एएचटीयू (AHTU) शाखेने छापा टाकून २ महिलांची सुटका केली असून, वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या १० आरोपींविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील या लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमाय मुंडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई पार पडली. लॉजचा मालक, व्यवस्थापक आणि तेथील काही सहयोगी महिलांना लॉजवर आणून वेश्याव्यवसायासाठी एजंट म्हणून काम करत असल्याचे उघड झाले.

२० मे रोजी एएचटीयू पथकाने ग्राहक म्हणून बनावट व्यक्तीला लॉजवर पाठवून सापळा रचला. या दरम्यान दोन महिला मिळून आल्या आणि त्यानंतर लॉज व्यवस्थापक व एजंटांना अटक करण्यात आली. लॉज चालक व तीन आरोपी सध्या फरार आहेत.
आरोपींची नावे अशी:
- किशोर नरहरी तळेकर , रा. म्हाडा कॉलनी, लातूर (फरार)
- श्याम किशोर तळेकर , रा. म्हाडा कॉलनी, लातूर (फरार)
- शाहरू तळेकर , रा. म्हाडा कॉलनी, लातूर (फरार)
- अमोल अंकुश कांबळे (वय २०), रा. म्हाडा कॉलनी, बाभळगाव रोड, लातूर
- संतोष किशोर तळेकर (वय ३०), रा. म्हाडा कॉलनी, लातूर
- अजय तात्याराव कांबळे (वय ४०), रा. उत्तूर नगर, लातूर
- सीस अम्बादास बिराजदार (वय २५), रा. जिजामाता नगर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
- समर्थ धन्यकुमार कवडे (वय २2), रा. शुक्रवॉर पेठ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
- समर्थ नितीन भोसले (वय २1), रा. शुक्रवॉर पेठ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
- विश्वजीत मोहन शिंदे (वय १९), रा. शुक्रवॉर पेठ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
या प्रकरणात विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.