आरोग्यक्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

देवणी पोलिसांची मोठी कारवाई! दोन जण अटकेत.

दिनांक: 20 मे 2025
लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांकडून धडक कारवाया सुरूच असून, देवणी पोलिसांनी 19 मे रोजी मोठी कारवाई करत तब्बल 61 किलो वजनाच्या गांजाच्या झाडांचा साठा जप्त केला आहे. बाजारभावाने या मालाची किंमत सुमारे 6 लाख 10 हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई तोगरी शेतशिवारात करण्यात आली असून, एका शेतातून गांजाची झाडे उगमस्थानीच पकडण्यात आली. ही गुप्त माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या नेतृत्वात पोलिसांनी तात्काळ पथक रचना करून छापा टाकला.

छाप्यामध्ये गंगाराम हाकू चव्हाण आणि संतोष गंगाराम चव्हाण (दोघे रा. तोगरी, ता. उदगीर, जि. लातूर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या विरोधात देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजाची एकूण 28 झाडे जप्त करण्यात आली असून, त्यांचे वजन 61 किलो इतके आहे.

या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक वऱ्हाडे हे पुढील तपास करत असून, कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, सपोनी डोके, पीएसआय गोंड, वराडे, डफडवाड, तसेच पोलीस कर्मचारी कोंडामंगले, कलवले, गुणाले, डोईजोडे, कुरे, शटकार, बिरादार यांनी सहभाग घेतला.

या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, गांजासारख्या अवैध शेतीवर पोलिसांनी रोखठोक कारवाई करत दाखवून दिलं आहे की, अशा गैरकृत्यांना आता जिल्ह्यात मुभा नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button