क्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

8 तासांत खून प्रकरणातील आरोपी गजाआड – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.

लातूर, दि. 15 मे 2025
शेतातील भांडणाच्या रागातून सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या व्यक्तीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या आठ तासांत शोध घेत अटक केली आहे. ही कामगिरी शास्त्रोक्त पद्धतीने व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी बोपला (ता. लातूर) येथील दयानंद भगवान काटे (वय 55) याच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला करून गंभीर जखमी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मयताच्या मुलाच्या तक्रारीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी पथकासह तपासाची दिशा आखली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, गोपनीय बातमीदारांची मदत घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने तपास सुरू करण्यात आला.

गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटली. विशेष म्हणजे खून करणारा दयानंद काटे याचा सख्खा लहान भाऊ – देवानंद भगवान काटे (वय 43) – यानेच आपल्या अल्पवयीन मुलासह हा थरारक प्रकार केल्याचे उघड झाले. शेतीच्या वादातून राग मनात धरून मोठ्या भावाचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ 8 तासांत रात्री 9 वाजेच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली. सदर प्रकरणाचा पुढील तपास लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे करत आहेत.

या कामगिरीत पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली पो.उ.नि. राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार अर्जुन राजपूत, युवराज गिरी, राहुल सोनकांबळे, राजेश कंचे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, रियाज सौदागर, संतोष देवडे, गणेश साठे व शैलेश सुडे या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभावी कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button