आंतरवालीत काल सकाळी ८ वाजता इच्छुकांच्या बैठकांना सुरुवात झाली. २४ तास उलटून गेले तरी बैठका सुरूच.

बेधडक आवाज – (जिल्हा प्रतिनिधी)
बैठक व मुलाखतींसाठी राज्यभरातून अंदाजे दहा हजार बांधव आंतरवालीत आले होते. आरक्षण चळवळीमध्ये प्रत्येकाचे योगदान आहे. मतदारसंघानुसार प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेऊन जरांगे पाटील इच्छुकांना मार्गदर्शन करीत आहेत. मतदारसंघातून एकच इच्छुक निवडण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. कोणत्या मतदारसंघात लढायचे व कुठे पाडायचे हा निर्णय ३० तारखेला घेतला जाणार असला तरी पुढच्या फळीत काम करणाऱ्या मराठासेवकांची एकजूट ठेवण्यासाठी या प्रक्रियेतून जावेच लागणार आहे असे समजते.
काल सायंकाळी चार वाजेपर्यंत जरांगे पाटलांनी अन्नाचा कणही घेतला नव्हता. मराठासेवकांच्या विनंतीनंतर थोडी खिचडी खाऊन पुन्हा कामाला लागले. २४ तास उलटून गेले आहेत, क्षणाचीही विश्रांती व झोप न घेता सलग बैठका सुरू आहेत तरी योद्धा थकत नाही. गाव खेड्यात, शेतात, कामावर असलेल्या प्रत्येक मराठ्याचा विश्वास व अपेक्षांची ओझे मनोज दादांच्या खांद्यावर आहे. समाजाला न्याय व त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी येणारे प्रत्येक आव्हान पेलण्याची त्यांची तयारी आहे.
मनोज जरांगे यांच्या अथक परिश्रमाला, जिद्दीला आणि समाजाप्रती असलेल्या त्यागाला सलाम मराठा समाज सलामी देत आहे.