प्रशासनमहाराष्ट्रराजकारण
सचिनभैय्या दाने यांनी ही विधानसभा निवडणूक लढवलीच पाहिजे यावर शिवसैनिक ठाम.

बेधडक आवाज -(जिल्हा प्रतिनिधी)
शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख सचीनभैया दाने यांच्यासाठी लातूर ग्रामीण मधील शिवसैनिकांनी स्वखर्चाने आज विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातून आज रोजी नामनिर्देशन पत्र घेतले. सचिनभैय्या दाने यांनी ही विधानसभा निवडणूक
लढवलीच पाहिजे यावर शिवसैनिक ठाम असून ते ताकदीने लढणार असल्याचे बोलले जाते. मतदारसंघातील जनता ही स्वतः कामाला लागली असून शिवसेना पक्षश्रेष्ठी हे लातूर ग्रामीण ची जागा , जागावाटपाचा तिढा सोडवून नक्कीच उमेदवारी देतील असा विश्वास शिवसैनिकांनी बोलून दाखवला.यावेळी शिवसेना युवासेनेचे नितीन औसेकर, विशाल देवकते, धनराज शिंदे, शाम राजे,गणेश पवार, वैभव पतंगे व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…