आठ कोटींच्या अपहारामागील आर्थिक गुंतागुंतीचा तपास गतीत”

लातूर | दि. 02 मे 2025
माहेश्वरी बहुउद्देशीय सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल ₹8 कोटी 18 लाखांचा अपहार झाल्यानंतर तब्बल दिड वर्ष फरार असलेला कॅशियर सोमनाथ गोरख पंडीत याला आर्थिक गुन्हे शाखेने ढोकी (जि. धाराशिव) येथून सापळा रचून अटक केली.
फेब्रुवारी 2024 मध्ये या अपहारप्रकरणी गांधीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष लेखापरिक्षकांच्या अहवालानंतर तपासाला गती मिळाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास हाती घेतला.

टकेपूर्वी सोमनाथ पंडीत दीर्घ काळ फरार होता. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेने ढोकी येथे सापळा लावून 01 मे रोजी रात्री 10 वाजता त्याला ताब्यात घेतले.
अटकेमुळे ठेवीदारांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, आरोपीकडून अपहाराची रक्कम कुठे व कशी वळवली यासह सहआरोपींची माहिती आणि आर्थिक साखळीचा तपशील मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
मा. न्यायालयाने आरोपीला 7 मे 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.अधीक्षक सुरेशकुमार राऊत व आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी – राजेश्वर हम्पल्ले, नामदेव पाटील, युवराज गाडे, रामानंद इरपे, बाळासाहेब ओवांडकर, अर्जुन कार्लेवाड यांनी संयुक्तपणे केली.