उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस रेणापूर तालुक्यात उत्साहात साजरा.

Bedhadak awaj :-(latur)रेणापूर तालुक्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पांढरी येथील केशव नारायण महाराज देवस्थान येथे बाबा महाराज यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख सचीनभैया दाने यांच्या वतीने आरती करण्यात आली.
याचवेळी,
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंजूर झालेल्या तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सभागृह बांधकामाचे भूमिपूजन जिल्हाप्रमुख सचीनभैया दाने आणि बाबा महाराज यांच्या हस्ते करण्यात आले व कामाला सुरुवात करण्यात आली.
रेणापूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. तसेच, रेणापूर येथील ग्रामदैवत रेणुकादेवी मंदिरात महाआरती करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमास केशव नारायण महाराज देवस्थानचे महंत ज्ञानेश्वर महाराज, अशोक महाराज गिरी, निलेश घाडगे, मंगेश सपकाळ, राहुल चीद्रे, अतुल गोकुळे, गोविंद घाडगे, नितीन घाडगे, अजिंक्य पनगुळे, महेश दाडगे, शहरप्रमुख रवी चव्हाण, श्याम राजे, भानुदास कुडके, सौरभ साबदे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.