Bedhadak awaj लातूर, 09 फेब्रुवारी – तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूरच्या वतीने आज श्री केशवराज विद्यालय, शाम नगर, लातूर येथे तायक्वांदो कलर बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेत केशवराज विद्यालयाचा श्रीगणेश खडबडे याने ए प्लस ग्रेडसह सुवर्णपदक पटकावले. तो या ग्रेडेशनमधील उत्कृष्ट परीक्षार्थी ठरला.
यासोबतच नमन पारिक, सृष्टी कांबळे, स्वराली देशपांडे आणि श्रुतिका झिपरे यांनीही ए प्लस ग्रेड मिळवत यश संपादन केले. परीक्षक म्हणून कुकिऑन साउथ कोरिया परिक्षक व आशियाई तायक्वांदो प्रशिक्षक नेताजी जाधव, तसेच धनश्री मदने, एस. व्ही. कुलकर्णी, जानवी मदने, विवांशी अंदुरे आणि विराज देशमुख यांनी काम पाहिले.
या ग्रेडेशन परीक्षेसाठी 57 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. तायक्वांदो हा परदेशी खेळ असून, तो मार्शल आर्ट प्रकारात मोडतो. या खेळामुळे शरीर, मन आणि मेंदू मजबूत होतो, असे यावेळी सांगण्यात आले.
परीक्षेत ए ग्रेडने उत्तीर्ण झालेल्या तेज पारीक, आर्यन नागटिळक, आशुतोष कांबळे, सृष्टी भुतडा, जानवी यादव, देवांशी हंडीबाग, श्रद्धा मोरे, आरोही राऊतराव, तपस्वी परिहार, समर्थ जाधव, श्रीराम मोरे, तेजश्री देशमुख, पूजा जाधव आणि अहिल पठाण यांचेही कौतुक करण्यात आले.