श्री त्रिपुरा महाविद्यालय व रिलायन्स लातूर पॅटर्नचा बारावी परीक्षेत घवघवीत यश: 98.46% निकाल,

लातूर | प्रतिनिधी
श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री त्रिपुरा महाविद्यालय व रिलायन्स लातूर पॅटर्नचा इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) चा निकाल 98.46 टक्के लागून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यंदाच्या परीक्षेत प्रतीक्षा पायंचे हिने 90.5% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
श्रेया इंगळे हिने 88.83% गुणांसह द्वितीय तर श्रेया लक्कू हिने 86% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. तसेच मानस कब्बूर (86%), सृष्टी डेरे (85.33%), शरयू केंद्रे (85.33%), अपेक्षा सावंत (85.16%) व सोम्या महाजन (85%) या विद्यार्थ्यांनी 85% पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तुंग यश मिळवलं आहे.

या विद्यार्थ्यांच्या विषयानिहाय यशाचाही उल्लेख करावा लागेल. भौतिकशास्त्र विषयात १०० पैकी ९० पेक्षा अधिक गुण मिळवणारे 5 विद्यार्थी, रसायनशास्त्रात 9 विद्यार्थी, गणितात 8 आणि जीवशास्त्रात 5 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केलं आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव, सचिव व प्राचार्या सौ. सुलक्षणा केवळराम, कार्यकारी संचालक ओंकार होनराव, कोषाध्यक्षा प्रेरणा होनराव, अकॅडेमिक प्रमुख प्रा. संगम खराबे यांच्यासह प्रा. सतिष पाटील, प्रा. मिरा मुंढे, प्रा. प्रसाद कुलकर्णी, प्रा. मेहराज शेख, प्रा. दिपमाला तेलंग, प्रा. अश्विनी मोरे, प्रा. शुभांगी गंगथडे, प्रा. मेघा दिवे, प्रा. रोहित भिंगोले, प्रा. स्नेहा पाटील, प्रा. आरती घोडके, प्रा. नेमीचंद बनसोडे आदी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
श्री त्रिपुरा महाविद्यालयाने पुन्हा एकदा लातूरच्या शैक्षणिक यशात भर घालत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.