महावितरणच्या हलगर्जीपणावर शेतकऱ्याचा संताप.

लातूर | नांदगाव (ता. लातूर) येथे वीज वितरण कंपनी महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका थेट जनावरांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुटलेल्या विद्युत वाहक तारेला शॉक लागून शेतकरी बालाजी ढमाले यांच्या रेड्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना ११ जून रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे विद्युत तार तुटून जमिनीवर पडली होती. परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर याची माहिती दिली होती. मात्र, त्याकडे कोणतंही लक्ष न देता ती तार तशीच पडून राहिली.
ढमाले हे नेहमीप्रमाणे जनावरे चारण्यासाठी शिवारात घेऊन गेले असता, तुटलेल्या तारेला रेडा स्पर्शल्यामुळे त्या

ला जोरदार शॉक बसला आणि तो जागीच मृत झाला.
या प्रकारामुळे शेतकऱ्याचं अंदाजे दीड लाखांचं नुकसान झालं आहे. ढमाले यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी महावितरणच्या हलगर्जी कारभारावर संताप व्यक्त करत नुकसानभरपाईची जोरदार मागणी केली आहे.
“वेळेवर उपाययोजना केल्या असत्या, तर माझा रेडा वाचला असता,” असं ढमाले यांचं म्हणणं आहे.
हा प्रकार म्हणजे महावितरणच्या बेजबाबदारपणाचं उत्तम उदाहरण असून, आता तरी प्रशासन जागं होणार का? असा सवाल ग्रामस्थ विचारू लागले आहेत.