आरोग्यदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

देशाने एक महान अर्थतज्ज्ञ आणि अनुभवी नेते गमावले आहेत.

बेधडक आवाज (दिल्ली):-
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे आज, 26 डिसेंबर 2024 रोजी, दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वसनास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते आणि 2004 ते 2014 या काळात त्यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडली. 1991 ते 1996 या काळात ते पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अर्थमंत्री होते. 1991 मध्ये त्यांनी उदारीकरणाच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाची मोठी आर्थिक वृद्धी झाली आणि परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात भारतात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंह यांच्या कुटुंबियांना फोन करून शोक व्यक्त केला आहे. तसेच, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांनी एम्स रुग्णालयात भेट दिली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी हे बेळगावातील सभा रद्द करून दिल्लीला परतले आहेत.

डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे देशाने एक महान अर्थतज्ज्ञ आणि अनुभवी नेते गमावले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button