डॉ.घुगे वर खुन,अपहरण, मारामारी,फसवणूक, अट्रॉसिटी,शासकीय कामात अडथळा,असे गुन्हे दाखव आहेत.

बेधडक आवाज :(लातूर)
गेल्या चौदा वर्षापूर्वी पासून पुणे आणि लातूर मध्ये विविध पोलीस स्टेशन मध्ये गंभीर गुन्हे नोंद असणारे लातूर मधील आयकॉन हॉस्पिटलचे संचालक फरार आरोपी डॉ प्रमोद घुगे यांना लातूर पोलिसांनी बाळु डोंगरे खुन प्रकरणात उत्तराखंड राज्यातून अटक केली आहे. डॉ घुगे यांनी अनेकांना सोबत घेऊन विविध गुन्हे केले आहेत, प्रत्येक गुन्ह्यात सह आरोपी आहेत. आत्ता पर्यंत विविध पोलीस स्टेशन येथे डॉक्टर वर खुन, अपहरण, मारामारी, फसवणूक, अट्रॉसिटी, शासकीय कामात अडथळा, या सारखे 05 गंभीर गुन्हे पुणे आणि लातूर येथे नोंद असून ते न्यायालयात प्रलंबित आहेत. अनेक नागरिकांनी आणि पिडीत रुग्णांनी या डॉक्टर विरुद्ध अनेक तक्रारी प्रशासनाकडे केलेले आहेत ज्याची किरकोळ दखल प्रशासनाने घेऊन कारवाई केलेली आहे. सदर डॉक्टर ने अनेकांना अंत्यत क्रूर पद्धतीने जबर मारहाण करून जखमी केलेले आहेत. आणि हे असे गुन्हे करण्या करिता ते अनेकांची मदत घेतात
आत्तापर्यंत या डॉक्टर विरुद्ध लातूर आणि पुणे येथील विविध पोलीस स्टेशन मध्ये खालील प्रमाणे अनेक गुन्हे नोंद आहेत
1) पोलीस स्टेशन लातूर शिवाजी नगर
गु. र. नं.339/2020
भा द. वि. कलम 326,143,147,148,149
2) पोलीस स्टेशन लातूर
शिवाजी नगर
गु. र. नं. 321/2020
भा. द. वि. कलम
420 फसवणूक ,419,304 आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय आधिनियम कलम 3
3)पोलीस स्टेशन लातूर
एम. आय. डि. सि
गु. र. नं.237/2024
भा. द.वि. कलम 363 अपहरण, 343,323,324,504,506,143,147,149,आणि अनुसूचित जाती जमाती कायदा ( अट्रॉसिटी ) कलम 3(1)(r),3(1)(s)
4) पोलीस स्टेशन पुणे
बंडगार्डन
गु. र. नं. 146/2010
भा. द. वि कलम 353,504,506,323,324
5) पोलीस स्टेशन लातूर
शिवाजी नगर
गु. र. नं.489/2024
भा. न्या. सं. कलम 103(1) खुन , 3(5)
या नुसार सदर डॉक्टरवर अनेक गुन्हे नोंद आहेत सदर डॉक्टर हा सराईत गुन्हेगार आहे उच्चाशिक्षित डॉक्टर असल्याचा फायदा घेत आणि रुग्णांची सेवा करतो असे भासवून प्रत्येक गुन्ह्यात अटकपूर्व जामीन घेऊन समाजात मोकाट वावरला. रुग्ण हक्क संरक्षण समिती आणि जागृत पत्रकारांनी लातूरमधील नागरिकांच्या आणि रुग्णच्या हितासाठी या डॉक्टर विरुद्ध अनेकदा आवाज उठवला आहे.सदर सराईत गुन्हेगार हा लातूर सारख्या शांत शहरातील विविध समाजातील नागरिकां सोबत राहणे, वावरणे, फिरणे,हे सामान्य नागरिकांसाठी धोकादायक आहे. म्हणून प्रशासनाने डॉ प्रमोद घुगे यांना लातूर शहरातून हद्दपार/ तडीपार करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा ( मोक्का ) अंतर्गत कारवाई करावी हि विनंती