बाळू डोंगरे खून प्रकरणातील फरार आरोपीला उत्तराखंडमध्ये पकडले!दुसरा आरोपी अद्याप फरार!

बेधडक आवाज-(लातूर)
लातूरमध्ये बाळू डोंगरे हत्याकांडाच्या तपासाच्या गतीवर आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते.डॉक्टर आणि त्याच्या भाच्यांनी संगनमत करून बाळू डोंगरे यांच्या हत्येचा बनाव रचला आणि पोलिस तपासाची दिशा चुकीची ठरवली. या घटनेनंतर, पोलिसांनी तपास सुरू केला, परंतु आठवडाभर उलटून देखील मुख्य आरोपींना पकडण्यात अपयश आले होते.असे असताना, लातूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय उपस्थित झाला होता मात्र आज 11 डिसेंबर 2024 रोजी घडलेल्या धक्कादायक खून प्रकरणात अखेर एक आरोपीला उत्तराखंडमध्ये पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आयकॉन हॉस्पिटलमध्ये बाळू भारत डोंगरे (वय 35) यांचा अमानुष मारहाण करून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होताच हे दोघे फरार झाले होते.पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी जबरदस्त मोहीम उघडली. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी अनेक ठिकाणी शोध घेतला. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे डॉक्टर प्रमोद घुगे याला उत्तराखंडमधून पकडण्यात आले. मात्र, दुसरा आरोपी अनिकेत मुंडे अजूनही फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
आता प्रश्न हा आहे की इतक्या गंभीर गुन्ह्यानंतर आरोपींना फरार होण्यासाठी संधी मिळतेच कशी?
पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे, पण अनिकेत मुंडे अद्याप फरार असल्याने याप्रकरणी अधिक कठोर आणि जलद कारवाई होणे गरजेचे आहे. लातूरकरांना या खून प्रकरणात आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होण्याची अपेक्षा आहे!