शिक्षणमहाराष्ट्र

Reliance Latur Pattern चा घवघवीत यश: IIT-JEE ॲडव्हान्ससाठी 37 विद्यार्थी पात्र, ध्रुव पारसेवार देशात 746 व्या क्रमांकावर.

लातूर: राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या JEE Main 2025 परीक्षेत Reliance Latur Pattern ने यंदाही आपली यशस्वी परंपरा कायम ठेवत घवघवीत कामगिरी केली आहे. देशभरातून सुमारे 15.39 लाख विद्यार्थ्यांनी दिलेल्या या परीक्षेतून संस्थेचे तब्बल 37 विद्यार्थी IIT-JEE ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.

या विद्यार्थ्यांमध्ये चि. ध्रुव पारसेवार याने 99.909 पर्सेन्टाइलसह 746वा अखिल भारतीय क्रमांक मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर चि. अथर्व नराचे याने 99.86 पर्सेन्टाइलसह द्वितीय स्थान मिळवले आहे.

अन्य उल्लेखनीय विद्यार्थी:

प्रेम जाधव – 98.54 पर्सेन्टाइल

हनुमान कुंदरगे – 97.86

समीर शेख – 95.57

सिद्धी तोडकरी – 96.90

निलेश पाटील – 96.51

अमन पठाण – 96.48

शिवानी कांबळे – 95.05

तसेच श्रेयश दंडनायक, ओंकार हरनुळे यांचाही यामध्ये समावेश आहे.

संस्थेच्या अध्यक्षांचे गौरवोद्गार: या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले की, “इयत्ता 10वी मध्ये अत्यंत साधारण गुणवत्ता असलेले हे विद्यार्थी अवघ्या दोन वर्षांत IIT-JEE परीक्षेसाठी सज्ज झाले. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाला सलाम!”

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे मान्यवर: प्राचार्या मा. सुलक्षणा केवळराम मॅडम, कोषाध्यक्ष मा. प्रेरणा होनराव, कार्यकारी संचालक श्री. ओंकार होनराव, तसेच प्रा. संगम खराबे, प्रा. रामशंकर यादव, प्रा. सुनील कुमार वर्मा, प्रा. विकास कुमार सोनी, प्रा. अमित सेंगार, प्रा. गौतम कुमार, प्रा. रोहित यादव, प्रा. सतिष पाटील, प्रा. प्रसाद कुलकर्णी आदी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Reliance Latur Pattern चा हा यशस्वी प्रवास लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button