क्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारणशिक्षण

कनिष्ठ पोलीस अधिकारी वरिष्ठांची प्रतिमा मलीन करतोय,संतोष नागरगोजे चुकीचे तर शहरातील सामान्य नागरिक अनुभवतोय ओरडून सांगतोय तेही चुकीचंच का?

लातूर -बेधडक आवाज दि-20/04/2025
लोकशाहीच्या पटलावर सर्वात महत्त्वाची भूमिका जर कोणी निभावत असेल तर ते म्हणजे आपले महाराष्ट्र पोलीस. सामाजिक राजकीय प्रशासकीय इत्यादी सर्वच विभागामध्ये साजरे होणारे उत्सव बैठका यामध्ये सदा सर्वदा सहभाग असल्याशिवाय हे सर्व कार्य पूर्ण होत नाहीत. ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस ज्याला आपण म .पो. असे संबोधतो. आता याच महाराष्ट्र पोलिसांची आपल्या लातूर नगरीच्या नगर रचनेच्या राजकीय वातावरणाच्या सामाजिक विचारधारेच्या होणाऱ्या मोठ्या उत्सवांच्या आणि शैक्षणिक पॅटर्नच्या कार्यकाळात जर विचार केला. तर गेली दहा ते पंधरा वर्षे झाली आपण सर्वजण लातूरकर पाहत आहोत. की लातूर नगरीचा होत असलेला कायापालट आणि लातूर शैक्षणिक पॅटर्न पासून आज गुन्हेगारी पॅटर्न, गॅंग वॉर, दरोडा ,खून, बलात्कार , अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट हा पॅटर्न निर्माण होत आहे. आजपर्यंत सर्व लातूरकरांनी अनुभवलेलं लातूरचं सामाजिक

बांधिलकीच धोरण आणि राजकीय सामांजसपणा बाळगून लातूरकरांच्या विकासासाठी केलेली राजकीय कुरघोडी या सर्व घटनाक्रमांमधून लातूरकरांना कधीही असुरक्षितता जाणवली नाही. पण आज पर्यंत लातूरच्या महाराष्ट्र पोलीस खात्याच्या मुख्य पदावर आलेले अनेक अधिकारी हे सक्षम कर्तव्यदक्ष आणि वफादारीने इमानदारीने आपले कर्तव्य बजावताना आपण पाहिले. तरीपण गेली एक पाच ते सहा वर्षे झाली असावीत सर्व लातूरकर पाहत आहेत की लातूरमध्ये गुन्हेगारी क्षेत्र आपले प्राबल्य वाढवत आहे. ज्या गोष्टी लातूरकर न्यूज च्या माध्यमातून ऐकायचे / पाहायचे त्याच गोष्टी आज त्यांच्या डोळ्यासमोर लातूर नगरीमध्ये दिवसाढवळ्या भरल्या बाजारा मध्ये भर वस्तीमध्ये महाविद्यालयीन युवकांच्या टोळक्यांमध्ये पहावयास मिळत आहेत.लातूरकर आपली अस्मिता विसरले की लातूर नगरीला बदनाम करण्यासाठी लातूरकरांचे खच्चीकरण करण्यासाठी लातूरचे राजकारण गचाळ करण्यासाठी किंवा पोलिसांना जेरीस आणण्यासाठी की मुंबई पुणे च्या धरतीवर चालू असलेलं बीडचं गुन्हेगारी क्षेत्र लातूरमध्ये आपली पायमुळ रोवत आहे का? तसं पाहिलं तर लातूर शहराचे अनेक प्रश्न आपल्या लातूर शहराला लाभलेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमय्याजी मुंडे यांच्या अधिपत्याखाली तडीस गेले. लातूरच्या वाहतूक विभागाचे अधीक्षक कदम साहेब यांच्याही पुढाकारातून आज लातूरकरांनी अनेक वर्षापासून पाहिलेले स्वप्न म्हणजे लातूरचे मुख्य बाजारपेठ असलेली गंजगोलाई आज मोकळा श्वास घेत आहे अतिक्रमणधारकांना आज एक कायद्याचा धाक आणि पोलिसांची ताकद दाखवून देण्याचे काम आपल्या लातूर पोलिसांनी करून दाखवलं आहे. यामध्ये जशा नाण्याच्या दोन बाजू तसाच आपल्या लातूर नगरीच्या पोलीस विभागाचे पण दोन बाजू पहावयास मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये लातूर शहरांमध्ये पसरलेली दहशत खुलेआम होत असलेले खून चालू असलेले अनेक ठिकाणचे अवैध धंदे त्यामध्ये गांजा, दारू, मटका,जुगार घरगुती वेश्याव्यवसाय असे अनेक प्रकारचे अवैध्य उद्योग राजरोसपणे चालू आहेत. आपण सर्वांनी पाहिलं असेल तर गेल्या आठवड्यामध्येच लातूर शहराचा शैक्षणिक पॅटर्न जगून जन्माला आला तो म्हणजे ट्युशन एरिया याच एरियामध्ये अनेक ठिकाणी लातूर पोलिसांनी धाड टाकून कॅफे सेंटरच्या नावाखाली चालू असलेले महाविद्यालयीन युवकांना बरबाद करणारे अवैद्य कॉफी शॉप यांच्यावर सशक्त कारवाई करून सज्जड दमही दिला आहे. मुळामध्ये बाळ रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही तसं पोलीस खात्यामध्ये उच्च पदावरून आदेश आल्याशिवाय खालचे कर्मचारी कार्यरत होत नाहीत असेच गणित असावं. लातूरकरांनी आजपर्यंत सदा सर्वदा लातूर पोलीस विभागाला सहकार्याच्या भूमिकेतून मदत व सहकार्य केल्याल आहे. सध्याचे वातावरण पाहता राजा कर्तव्यदक्ष आहे दिलदार आहे कायद्याची जाण असलेला आहे आणि कायद्याचे पालन करणारा आहे. अर्थात आपल्या लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक.सोमय मुंडे सर आपल्या कर्तव्य काळात अनेक उत्तम कामगिरी करत आहेत त्यांच्या आदेशाचे पालनही बऱ्यापैकी होत असताना सर्व लातूरकर पाहत आहेत. पण लातूरकरांना पडलेले काही प्रश्न म्हणजे लातूर शहरांतर्गत लातूर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या अनेक पोलीस स्टेशन पोलीस चौकीमध्ये काही अधिकारी त्या पोलीस स्टेशनला आपली जहागीर समजून वर्षानुवर्षे त्याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. शासकीय नियमानुसार पोलिसांचा कर्तव्याचा कार्यकाळ हा मर्यादित असतो पण हा कायदाच जणू लातूरचे काही मुजोर पोलीस कर्मचारी अधिकारी विसरले असावेत. या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूर जिल्हा अध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी सविस्तर व अचुक माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लातूरकरांसमोर प्रसारित केली. लातूरच्या बदलत्या पॅटर्नच्या विरोधात अनेक समाजसेवक अनेक पत्रकार आणि संघटना पोलिसांना वारंवार निवेदन तक्रारी सादर करत आहेत. मग कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं तर आम नागरिक आपली तक्रार पोलीस चौकीमध्ये दाखल करतो राजकीय नेता हा आपल्या पत्रकार परिषदेमधून जाहीर करतो आणि एक सच्चा पत्रकार आपल्या प्रसार माध्यमाच्या मंचावरून समाजातील अवैद्य उद्योगांना वाचा फोडण्याचे काम करतो. मग त्यामध्ये स्पा या नावाखाली मसाज सेंटरच्या नावाखाली चाललेले वेश्याव्यवसाय असतील काल-परवात चाकूर परिसरामध्ये सापडलेल्या ड्रक्सचा अड्डा असेल, महाविद्यालयीन युवतींना होणारा मानसिक त्रास असेल विनयभंग असेल व्यापाराच्या नावाखाली महिलांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने उद्गारले जाणारे वाक्य असतील शिल्लक कारणावरून लातूरच्या युवकांमध्ये होत असलेली हाणामारीच्या प्रकरणा पासून खुन इथपर्यंतच नाही तर पाठीमागे लातूरकरांनी अनुभवलेला थरार भर दिवसा रोडवरती कोयत्याने केलेले वार असतील दगडाने ठेचून केलेला खून असेल रात्री बे रात्री आड मार्गाला वाहने आडऊन केल्याली लुटमार असेल. असे एक नाही अनेक विषय अनेक वर्षांपासून या पोलिसांच्या डायरीमध्ये फक्त आणि फक्त पेनने कागदावर लिहून काळे केलेले लिखाण म्हणून जमा आहेत. सांगायचं म्हणजे लातूर शहराचा सुरक्षेचा प्रश्न सध्याला ऐरणीवर आलेला आहे. सर्व लातूर जिल्हा पोलिसांची कुमक ज्यांच्या हातामध्ये आहे ते स्वतः कर्तव्यदक्ष असले तरी त्यांच्या अगोदर पासून गेली एक नाही दोन नाही तीन नाही तर चक्क दहा ते पंधरा वर्षापासून काही पोलीस लातूर जिल्हा सोडायला तयार नाहीत या चौकीतून त्या चौकीमध्ये बस अर्थात त्या त्या परिसरातील सर्व अवैद्य उद्योग हे त्यांच्याच आशीर्वादाने चालत असावीत. तसे हि काही प्रकरणा वरून समजते कि लातूर मधील अट्टल गुन्हेगार ज्यांच्या वरती पंधरा वीस पंचवीस असे गुन्हे शहरातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहेत. अशा गुन्हेगारांचे व पोलिसांचे एकूण एकाला भाई संबोधन्या इथपर्यंतचे संबंध घनिष्ठ असावेत असे कोणालाही बघताच क्षणी विश्वास न पाटणारे संबंध पाहण्यास मिळतात, तसे पाहता परवाला चाकूर परिसरामध्ये सापडलेला ड्रक्स चा अड्डा हा स्वतः मुंबई पोलीस कर्मचारी चालवत होता. तुळजापूर महाराष्ट्राची आई कुलस्वामिनी या ठिकाणीही ड्रक्सचा विळखा पडलेला आहे .त्या ठिकाणी संगीता नामक कोणी महिला ड्रक्सचा संपूर्ण बाजार सांभाळत होती.म्हणजे पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणे आणि आम्ही काही झालं तरी इथेच आणि याच ठिकाणी कार्यरत राहणार असाच संदेश ठीया मारून बसलेले पोलीस कर्मचारी आणि अधिकारी देत असावेत. मागील आठवड्यामध्ये मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी पुराव्यासह ज्या काही गोष्टी लातूरकरांसमोर जाहीर केल्या त्या गोष्टींवर आजपर्यंत त्या त्या परिसरातील पोलीस कर्मचारी अधिकारी बीट आमलदार एपीआय यांनी काय कारवाया केल्या याचा लेखाजोखा लातूरकरांना समजायला हवा! लातूर नगरीच्या या पोलीस विभागाकडे पाहता आज घडीला समस्त लातूरकर प्रश्नार्थक नजरेने पाहत आहेत. बोटावर मोजता येतील तेवढेच अधिकारी आज आपल्या कर्तव्याची जाण ठेवून सदरक्षणाय खलनिग्रहणाय या त्यांच्या ब्रीद वाक्याला साजेस काम करत आहेत. सर्व लातूरकरांची एकच अपेक्षा राजा बोले दल हाले असे काम जर लातूर पोलिसांनी केले तर नक्कीच लातूरमधून गावगुंडांचा गुंडागर्दीचा क्रिमिनल रेकॉर्डचा आणि चालू असलेल्या अवैध धंद्यांचा सुपडा साफ व्हायला वेळ लागणार नाही. काही ठिकाणी दबक्या आवाजात अनेक चर्चांना उधाण आले आहे .आमका पोलीस तमका पोलीस आला तेव्हा एवढी मालमत्ता आणि आज एवढी मालमत्ता हा नेमका सावळा गोंधळ आहे तरी काय? लातूरच्या कट्ट्यावर चाललेली चर्चा पोलीस अधीक्षक नंबर वन, वाहतूक विभागाच्या कारवाया नंबर वन, पण चिरेमिरी टेबलाखालची रसद हप्ते आणि गुप्त रित्या केलेली आर्थिक देवाणघेवाण या काही गोष्टींमुळे पोलीस खातं आम जनतेच्या नजरेतून अनेक दशकांपासून बदनाम होताना सर्वजण पाहत आहेत.आणि आज हि लातूर शहरातील प्रत्येक पोलीस चौकीच्या हद्दीतील पी आय पासून ते बिट अमलदारापर्यंत जो तो आपापला हिस्सा व्यवस्थित पद्धतीने लावून आहे.तेव्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी आपल्या अधिकाराचा सडेतोड वापर करत लातूर शहराला एक नवा पॅटर्न दाखवून द्यावा की बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या लोकशाहीच्या धरतीवर पोलीस आणि पोलीस विभागातील पदांचा दरारा दहशत ताकद काय असते. पोलीस अधीक्षक साहेबांनी ग्राउंड लेव्हलवर चाललेल्या अनेक अवैध धंद्याची त्या त्या परिसरातील जबाबदार पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्याकडून अंतभूत माहिती घेऊन सरसकट सडेतोड कारवाई करण्याचे आदेश का देत नसावेत यामागील कारण असे असावे का? चिरीमिरी घेऊन कायदा चालवणाऱ्या पोलिसांवरती जर स्वतः पोलीस कारवाई करत असतील तर पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होता कामा नये अशी विचारसरणी जर पोलीस अधीक्षकांचे असेल तर लातूर शहरात व जिल्ह्यात बदल होणे हे अशक्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button