चार तासांत गुन्ह्याचा छडा!सोनं आणि मोटारसायकलसह ८० हजारांचा मुद्देमाल जप्त.

लातूर |15 जून 2025
लातूर जिल्ह्यातील लामजना परिसरात ८४ वर्षीय वृद्धाला मारहाण करून १५ हजार रोख रक्कम व सोन्याच्या अंगठ्या हिसकावणाऱ्या तिघा अज्ञात आरोपींना केवळ चार तासात किल्लारी पोलिसांनी गजाआड केलं आहे. या गुन्ह्यातून ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल – सोन्याची अंगठी आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल – हस्तगत करण्यात आलेली आहे.
ही घटना दिनांक १४ जून २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता घडली. “तू आमच्या अंगावर थुकलास का?” असे कारण देत या वयोवृद्ध इसमाला तिघांनी मारहाण केली आणि त्याच्याकडील रक्कम आणि अंगठ्या हिसकावून पलायन केलं.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल शहाणे यांच्या नेतृत्वात पथकाने तात्काळ तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना शोधून काढण्यात आले. त्यांनी गुन्हा कबूल केला असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक आरोपींची नावे:
- वसीम रजाक शेख (२१), रा. शिंदगाव, ता. रेणापूर
- इम्रान महताब शेख (२४), रा. शिंदगाव, ता. रेणापूर
- कौरव जनक लहाडे (४१), रा. पाखरसांगवी
गुन्ह्याचा पुढील तपास किल्लारी पोलीस करत आहेत. ही संपूर्ण कारवाई पो.उ.नि. शिंदे, ढोणे व पोलीस अंमलदार गणेश यादव, दत्ता जाधव, बालाजी लटुरे, सोमवंशी, रवी करके व आबा इंगळे यांच्या प्रयत्नातून पार पडली.