लातूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढतेय!

लातूर | 14 जून 2025
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक विश्रामगृहात मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे उपनेते आनंद जाधव, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख सचिन दाने, महिला संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि इतर संलग्न संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत सदस्य नोंदणी, शाखा बांधणी, तसेच महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी यावर सविस्तर चर्चा झाली. आगामी निवडणुका जिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येणार असून पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच पुढील रणनिती ठरेल. या निवडणुकांमध्ये शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असेल, असा ठाम विश्वास आनंद जाधव यांनी व्यक्त केला.
या बैठकीत काँग्रेस आणि भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे विरोधकांच्या चिंतेत भर पडली आहे. पक्षात होत असलेले हे इनकमिंग लातूरच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणण्याची नांदी मानली जात आहे.
बैठकीला शहर उपजिल्हाप्रमुख भास्कर औताडे, ग्रामीण उपजिल्हाप्रमुख विजय जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख कुलदीप सूर्यवंशी, महानगरप्रमुख ऋषी कदम, महिला अध्यक्ष कल्पना बावगे, लातूर शहर तालुकाप्रमुख बाबुराव शेळके, रेणापूर तालुकाप्रमुख कोंडिराम काळे, पॅरामेडिकल जिल्हाध्यक्ष सचिन बोडके, परवेझ पठाण, पवन रणदिवे, श्रीहरी डोपे, विजय कस्पटे, जयश्री भुतेकर, प्रतिभा डोळसे यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेची ही एकजूट आणि वाढती ताकद पाहता लातूरमधील विरोधकांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. लोकसंपर्क, संघटनबांधणी आणि मैदानात उतरलेली निष्ठावान फौज यामुळे आगामी निवडणुकांत शिवसेना लातूर जिल्ह्यात निर्णायक भूमिका बजावेल, हे स्पष्ट होत आहे.