‘मी शेतकऱ्याचा मुलगा आहे’ म्हणत रस्त्यावर उतरणारा भाजप नेता. गणेश गोमचाळे

लातूर |21 jul (Bedhadak awaj ) लातूरच्या राजकीय रणधुमाळीत जिथे बहुतेक लोक ‘पक्षनिष्ठा’च्या नावाखाली शेतकऱ्यांच्या वेदनांपासून पाठ फिरवतात, तिथे गणेश गोमचाळे या युवक नेत्याने आपली ओळख ठामपणे ‘शेतकऱ्याचा मुलगा’ म्हणून पटवून दिली आहे. केवळ भाषणातून नव्हे, तर थेट रस्त्यावर उतरून, शहर बंद घडवून, सरकारच्या आदेशांवरही निर्भयपणे प्रश्न उपस्थित करून. ही कृती केवळ राजकारणासाठी नव्हे, तर मनातून असलेल्या शेतकरीपणाच्या जाणीवेची साक्ष आहे.राजकीय कार्यकर्त्यांमध्ये जिथे चमकोगिरी, फोटोंचे फोलाट, आणि स्टंटबाजीची स्पर्धा असते, तिथे गोमचाळे यांनी शांत, संयमित पण ठाम भूमिका घेत विजय घाडगे पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात आवाज उठवला. एक शेतकरी पुत्र म्हणून, एक मराठा युवक म्हणून त्यांनी भूमिका मांडली, जी खऱ्या अर्थाने क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या विचारांची प्रचिती देणारी ठरली.या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उपस्थित होतो. शेतकऱ्यांच्या दुःखावर पोसणारे नेते आज कुठे आहेत? सोशल मीडियावरून विरोध दर्शवणारे, पण प्रत्यक्ष मैदानात न उतरणारे ते नेते आता गप्प का? पक्षादेश, नेतृत्वाचा सल्ला, की लाचारी नेमकं काय कारण आहे त्यांच्या गप्प बसण्याचं?एकीकडे छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांच्यावर भ्याड हल्ला होतो, आणि लातूरसकट संपूर्ण महाराष्ट्र हळहळतो, संतप्त होतो; पण दुसरीकडे पक्षातील आमदार मात्र सत्ताधाऱ्यांवर न बोलता, स्वतः प्रसिद्धीसाठी इतरांची निंदा करण्यामध्ये व्यस्त. हल्ला कोणावरही झाला असता तो दुर्दैवीच असतो, पण ज्या व्यक्तीने लहान वयातच सामाजिक नेतृत्वात पाय ठेवला, अशा घाडगे पाटील यांच्यावर हल्ला होणं हे कुणालाही अस्वस्थ करणारं आहे.हे सगळं पाहता गणेश गोमचाळेंनी दाखवलेलं धाडस वेगळंच ठरतं. सत्ताधारी पक्षात असूनही ‘पक्षापेक्षा आधी मी शेतकऱ्याचा मुलगा आहे’ हे सांगण्याचं धैर्य ही गोष्ट प्रत्येक नेत्यात नसते. कदाचित विरोधकांपैकी काहींना यातून लाज वाटावी, असा हा संदेश आहे.गणेश गोमचाळे हे केवळ बोलघेवडे नव्हेत, तर जाणते, लढवैय्या आणि परिस्थितीला भिडणारे राजकारणी आहेत, याची प्रचिती या आंदोलनातून मिळाली आहे. लातूरच्या राजकारणात जिथे मोजक्या लोकांना सामान्यांचा खरा दर्द कळतो, तिथे गोमचाळे यांनी शेतकऱ्यांच्या मुलाची बाजू आणि छावाचं काळीज दाखवून दिलं आहे.आज जेव्हा अनेकांनी “मी काय करू पप्पा?” असं विचारत पप्पांच्या मांडीवर जाऊन बसणं पसंत केलं, तेव्हा गणेश गोमचाळे रस्त्यावर उतरून लोकांसोबत उभे राहिले.त्यामुळे लातूरच्या राजकीय इतिहासात आज जे काही घडतंय, त्याचा नवा संदर्भ गणेश गोमचाळे यांच्या कृतीतून घडताना दिसतोय आणि हा संदर्भ भविष्यातील नेतृत्वाच्या दिशेचा स्पष्ट संकेत देतोय.