तिर्रट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा.

लातूर, दि. 20 जुलै 2025 – शहरातील लेबर कॉलनी परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली असून, या कारवाईत १२ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे 6 लाख 70 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, जुगाराचे साहित्य आणि काही वाहने असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेबर कॉलनी परिसरात १९ जुलै रोजी रात्री १० वाजता छापा टाकण्यात आला. या दरम्यान तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर तातडीने पथक तयार करून छापा टाकण्यात आला.गांधी चौक पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4 व 5 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तर पुढील तपास गांधी चौक पोलीस करत आहेत.अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत:1. फारुख ऊर्फ पाशामाई युसुफ मोमीन (58, लेबर कॉलनी)2. गफार अब्दुलसाब मणीयार (58, हत्तेनगर)3. शादीक गफुर बागवान (31, ताजुद्दिनबाबा दर्गा)4. सलिम अब्दुलवहाब कुरेशी (58, काझीमोहल्ला)5. मुस्तफा इस्माईल चौधरी (54, प्रकाशनगर)6. आसीफ इस्माईल पठाण (54, लेबर कॉलनी)7. महेश श्रीराम सुर्यवंशी (50, लेबर कॉलनी)8. अन्वर पाशा सय्यद (35, इस्लामपुरा)9. मिरमहमद मिररजा सय्यद (45, झिंगणअप्पा गल्लीत)10. महताब कलीम बागवान (28, बागवान गल्ली)11. वासीक एजाजअहमद सिद्दीकी (50, लेबर कॉलनी)12. अब्दुलसत्तार मदारसाहब शेख (57, खोरे गल्ली)सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, युवराज गिरी, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे आणि बोचरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.शहरातील अवैध जुगार अड्ड्यांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या मोहिमेला यश मिळत असून, या कारवाईमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार करण्यात आला असून, अशा प्रकारच्या कारवाया आगामी काळात अधिक तीव्र होतील, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.