प्रशासनमहाराष्ट्रराजकारण
अवैध देशी दारू साठ्यावर पोलीस ठाणे देवणी ची छापेमारी. 03 लाख 39 हजार रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त..

बेधडक आवाज – (जिल्हप्रतिनिधी)
विधानसभा निवडणूक 2024 अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची तीव्रता वाढविण्यात आली असून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सर्व ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपाय निलंगा नितीन कटेकर यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या नेतृत्वातील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर पथकाने मौजे वलांडी शिवारातील एका शेतातील पत्र्याच्या शेडवर छापेमारी केली.
सदर छापीमारीमध्ये आरोपी नामे
1)दत्तात्रय ज्योतीराम दुबे, राहणार वलांडी तालुका देवणी.
यांने स्वतःच्या फायद्यासाठी देशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करण्याकरिता साठवणूक करून ठेवलेले 03 लाख 39 हजार 500 रुपये किमतीचे जवळपास देशी दारूचे 100 बॉक्स जप्त करण्यात आले आहे.
नमूद आरोपी विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गोंड यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे देवणी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गोंड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोडामंगले, पोलीस अंमलदार संजय बोईने, देविदास कीवंडे, योगेश गिरी यांनी केली आहे.