Uncategorizedक्राइमप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

लातूर राज्य उत्पादन विभागाला नाही कुणाचा धाक, ना परवानाधारक मध्य विक्री धारकांना कुणाची भीती.

बेधडक आवाज मुख्यसंपादक – (शरद पवार)
लातूर शहरासह गाव खेड्यातील सर्वसामान्य परिवारातील महिलांना सर्वाधिक चिंता कोणती लागली असेल,तर ती परिवारातील व्यसनी सदस्यांची. काही केले तरी ही समस्या महिलां सह परिवारातील बालकांसाठी दिवसेंदिवस त्रासदायक होताना आज रोजीलातूर जिल्ह्यातील परिसरात पाहायला मिळत आहे. याचे कारण ही तसेच आहे, लातूर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत देण्यात येणाऱ्या मध्य विक्री परवाण्यांची आकडेवारी हि मोठी असून याची उलट बाजू म्हणजे ज्याप्रमाणे मानवी वसाहतीत खाद्यपदार्थांचे हॉटेल व भाजीपाल्यांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात चालतात त्याहून अधिक मध्यविक्री केंद्र मोठ्या संख्येने चालतात, नवल या गोष्टीच आहे की, शासनामार्फत मध्य विक्रीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत परवाने दिले जातात ते मध्य विक्री धारकांना

अनेक स्वरूपाचे नियम व अटी लागू करून ते परवाने दिले जातात व ते नियमानुसार चालावेत याकरिता कठोर नियमावली लागू केली जाते. परंतु लातूर शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार, राजरोषपणे व मनमानी कारभार जनतेच्या आरोग्याशी तसेच पारिवारिक संतुलन विस्कळीत होण्याकरिता कारणीभूत ठरत आहे. यामागील मुख्य कारण असे आहे की, लातूर शहरांमध्ये अनेक असे परवानाधारक मध्य विक्री केंद्र आहेत जे राज्य उत्पादन विभागामार्फत लागू करण्यात आलेल्या नियम व अटीला केराची टोपली दाखवत बेकायदेशीर मन मर्जी प्रमाणे हे दारू विक्री केंद्र पहाटे ठरवून देण्यात आलेल्या वेळेच्या अगोदरच उघडली जातात व ते मनमर्जी प्रमाणे बंद हि केली जातात.
अनेक नागरिकांच्या मनात असा विचार येतो की या दारू विक्री केंद्र चालकांना नेमका राज्य उत्पादन शुल्क

विभागाचा धाक आहे की नाही. जर हा धाक राज्य उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत दिला जात नसेल किंवा मध्य विक्री परवानाधारकांना या अधिकाऱ्यांचा धाक म्हणजे “चिरीमिरी खिलाओ मन मर्जी कारभार चलाव” असा सुरू असेल तर कानून कायद्याचा व सुव्यवस्थेचा अवमान दारू विक्री चालकांमार्फत होत नसून राज्य उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत होत असल्याचे आज रोजी स्पष्ट होतानाचे चित्र लातूर जिल्ह्यातील जनतेला स्पष्ट दिसत आहे.याचे उत्तम उदाहरण म्हणजे लातूर शहरात पहायचे असेल तर “ड्राय डे” या दिवशी सुरू असणारे बार अवैध दारू विक्री केंद्र तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मध्यविक्री केंद्र चालकांना देण्यात आलेल्या वेळेचा अभाव हे पाहता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने चिरीमिरीचे जुळते गणित बार चालक व देशी दारू विक्री चालकांशी जुळत असल्याचा भोंगळ कारभार पाहायला मिळते.

बॉक्स –
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्याचे सर्वाधिक बार लातूर जिल्ह्यात चालतात?

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत नागरिकांना बियर बार, बार, देशी दारू, असे अनेक स्वरूपाचे परवाने शासकीय नियमात बसवून दिले जातात.हि जितपत वस्तुस्थिती आहे तितकेच भयान सत्य या उलट आहे कि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचेच अनेक बार लातूर जिल्ह्यात चालत असल्याची चर्चा नागरिकांन मार्फत व पत्रकारांन मार्फत केली जात आहे.यात सत्यता कितपत आहे ते माहिती समोर आल्यानंतर आपणास समजेलच परंतु रक्षकच नियम अटी धाब्यावर बसवत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या व मित्र परिवाराच्या नावाने बारचे लायसन्स काढून बार बे रात्रीपर्यंत चालवीत असतील तर लातूर जिल्ह्यात चालणारी अवैद्य दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क विभाग का व कशासाठी थांबवेल? हा प्रश्न संशोधक ठरेल हे नक्की.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button